बेळगाव : महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती परीक्षा शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) कन्नड माध्यमातही घेण्यात यावी. त्याचा फायदा महाराष्ट्राच्या सीमावर्ती असलेल्या भागातील तरुणांना होईल. त्यासाठी कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाने 2 एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे.
महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सोलापूर, सांगली जिल्ह्यातील जत, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आणि मुंबई शहरामध्ये एकूण 377 कन्नड माध्यमांच्या शाळा आहेत. तेथे अंदाजे एकूण 44,850 विद्यार्थी कन्नड माध्यमातून शिक्षण घेत आहेत. कन्नड माध्याच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या कन्नड शिक्षकांना कन्नडऐवजी मराठी अथवा इंग्रजी माध्यात टीईटी देणे अशक्य आहे. माध्यम कन्नड आहे. प्रश्नपत्रिका मराठी असेल तर टीईटी देणे अवघड होईल. अल्पसंख्याक कन्नडडिगांसाठी उलंघन होईल. महाराष्ट्र शासनाद्वारे परीक्षा मराठी आणि कन्नड माध्यमातून घ्यावी. कर्नाटक सरकार मराठी माध्यमातील उमेदवरांसाठी मराठी माध्यमातून टीईटीचे आयोजन करते, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही करावे, अशी मागणी केली आहे.
चालू शैक्षणिक वर्षाच्या टीईटी परीक्षेसाठी (16 एप्रिल 2026) अर्ज करण्यास काही दिवस शिल्लक आहेत. तरी महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कन्नड भाषिक अल्पसंख्याकांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित टीईटी मराठी आणि कन्नड माध्यमातून घ्यावी, अशी विनंती केली आहे.