Rain Pudhari
बेळगाव

Belagavi Rain: बेळगाव परिसरात संततधार; वाहनधारकांची तारेवरची कसरत

बेळगाव जिल्ह्यात सोमवारपासून मान्सूनने हजेरी लावली

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सोमवारपासून मान्सूनने हजेरी लावली आहे. शुक्रवारीही सकाळी व संध्याकाळी पावसाच्या सरी आल्या. मात्र दुपारी पावसाने उसंत घेतली होती. पावसामुळे शहरात सखल भागात पाणीच पाणी झाले होते. क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

पावसाने तालुक्याच्या पश्चिम व पूर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. पिरनवाडीजवळ बेळगाव -खानापूर रोडवरून पाणी वाहत होते. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे वाहन चालकांना पाण्यातूनच वाहने हाकावी लागली. अशीच परिस्थिती गांधीनगर येथील रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली निर्माण झाली आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने ते तुंबले होते. सोमवारपर्यंत अशाच सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT