Railway  Pudhari
बेळगाव

Belgaum train schedule changes: काही रेल्वेंच्या वेळापत्रकात बदल

लोहमार्गाचे काम हाती घेतल्याने तसेच तांत्रिक कारणास्तव काही रेल्वेंच्या वेळापत्रकात बदल केला असून काही रेल्वे सेवा अंशत: रद्द करण्यात आल्याची माहिती नैर्ऋत्य रेल्वेने दिली

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : लोहमार्गाचे काम हाती घेतल्याने तसेच तांत्रिक कारणास्तव काही रेल्वेंच्या वेळापत्रकात बदल केला असून काही रेल्वे सेवा अंशत: रद्द करण्यात आल्याची माहिती नैर्ऋत्य रेल्वेने दिली आहे.

मुळवाड–जुमनाळ विभागात अभियांत्रिकी कामे हाती घेण्यात आली आहेत. बसवन बागेवाडी आणि विजापूर स्थानकांदरम्यान मुळवाड आणि जुमनाळ यांच्यामधील एलसी क्र. ७५ येथे सुरू असलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी कामांच्या अनुषंगाने, या विभागात धावणाऱ्या काही रेल्वेच्या संचालनात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

रेल्वे क्र. ५६९०६ हुबळी–सोलापूर एक्सप्रेस ही रेल्वे गुरुवारी १४ मे रोजी हुबळी आणि विजापूर दरम्यान अंशतः रद्द राहील. ही रेल्वे हुबळी येथून निघण्याऐवजी, विजापूर येथून नियोजित वेळेनुसार निघेल. रेल्वे क्र. ६६५०१ हुबळी–विजापूर स्पेशल रेल्वे १४ मे रोजी कुडगी आणि विजापूरदरम्यान अंशतः रद्द राहील. ही रेल्वे कुडगी स्थानकावरच थांबवली जाईल. रेल्वे क्र. ६६५०२ विजापूर– हुबळी स्पेशल रेल्वे १५ मे रोजी विजापूर आणि कुडगीदरम्यान अंशतः रद्द राहील. ही रेल्वे विजापूर येथून निघण्याऐवजी, कुडगी येथून नियोजित वेळेत सुटेल.

रेल्वे प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे नैर्ऋत्य रेल्वेकडून पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT