Jewellery Theft (Pudhari Photo)
बेळगाव

Belgaum jewellery theft: केअरटेकरनीच दिले डॉक्टर दांपत्याला टेन्शन; तब्बल दीड कोटींचे दागिने लांबविले

कॅम्प पोलिसांत सहाजणांविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : काळजी घेण्यासाठी अर्थात केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या सहाजणांनी वृद्ध दांपत्याच्या घरातील तब्बल दीड कोटींचे ९१० ग्रॅम सोन्याचे दागिने लुटल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील क्लब रोडवर उघडकीस आला आहे. या प्रकरणी वृद्ध महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी डॉ. अनुराधा विश्वनाथ धडेद (वय ८१, रा. तृप्ती निवास, क्लब रोड बेळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल सतीश कांबळे (शेडबाळ, ता. कागवाड), मणीकंठ मंजुनाथ वेर्णेकर (आळवण गल्ली, शहापूर), अनिल मुडलगी (बेळगाव), नागेश वड्डर (करीकट्टी, पो. भुरुणकी, ता. खानापूर), टी. गोपाळ (होसपेट, जि. बळ्ळारी) व सिद्धू रामचंद्र देवरड्डी (बेटगेरी, जि. गदग) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, यातील फिर्याददार वृद्धेचे पती डॉ. विश्वनाथ धडेद (वय ८३) हे वृद्धत्वामुळे अशक्त बनले असून झोपून असतात. त्यांची सुश्रृषा व सेवा करण्याची ताकद त्यांची पत्नी डॉ. अन्‍नपूर्णा यांच्याकडेही नाही. त्यामुळे, त्यांनी पतीच्या सेवेसाठी उपरोक्त संशयितांची नियुक्ती केली होती. दोघेही वृद्ध असल्याने अनेकदा कपाटाची चावी लावायला विसरायचे. याचाच फायदा उठवत उपरोक्त संशयितांनी त्यांच्या कपाटातून थोडेथोडे असे करत तब्बल ९१० ग्रॅम सोन्याचे दागिने काढून नेले आहेत. त्यांनी हा प्रकार ऑक्टोबर २०२५ ते १० मे २०२६ या दरम्यानचा आहे.

काही कामानिमित्त डॉक्टर वृद्धा त्यांचे दागिने तपासत असताना १० मे रोजी हा प्रकार उघडकीस आला. दागिने चोरीला गेल्या पाहून त्यांना जबर धक्का बसला. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून १ रोजी या प्रकरणी कॅम्प पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार उपरोक्त संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास निरीक्षक आनंद वणकुद्रे यांच्याकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT