theft Pudhari
बेळगाव

Belgaum Theft Cases: उपनगरांमध्ये घरफोड्या सुरुच; चोरट्यांचे आव्हान

गेल्या आठवडाभरात माळमारुती ठाणा हद्दीत चौथी घरफोडीची घटना

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहरासह उपनगरांमध्ये घरफोड्या सुरुच असून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. गेल्या आठवडाभरात माळमारुती ठाणा हद्दीत चौथी घरफोडीची घटना घडली. रामतिर्थनगरमधील निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे बंद घर फोडून दीड लाखांचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार मंगळवारी (दि. १६) उघडकीस आला.

रामतिर्थनगरमधील रहिवासी राजाराम बाबू रागी-पाटील हे ११ रोजी सायंकाळी त्यांचे घर बंद करुन बंगळूरला गेले होते. मंगळवारी ते बेळगावला परतले असता त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी घरातील साहित्य विस्कटून, ८० हजाराची रोकड, चार मनगटी घड्याळे, लॅपटॉप, २५० ग्रॅम चांदीच्या वस्तू व अन्य साहित्य पळवून नेले. याची किंमत १ लाख ३४ हजार रुपये नोंदवली आहे. माळमारुती परिसरात गेल्या आठवडाभरात चारवेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत.

याशिवाय शहापूर पोलिस ठाणा हद्दीतील खासबागमध्येही चार दिवसांपूर्वी घरफोडी करुन साडेतीन लाखांचा ऐवज लांबवल्याची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT