Accident Pudhari
बेळगाव

Belagavi accident : दुचाकी अपघातात शिक्षिका ठार

दुचाकी अपघातात शिक्षिका ठार झाल्याची घटना रविवार सकाळी हुक्केरी तालुक्यातील निडसोशी येथे घडली

पुढारी वृत्तसेवा

अंकली : दुचाकी अपघातात शिक्षिका ठार झाल्याची घटना रविवार सकाळी हुक्केरी तालुक्यातील निडसोशी येथे घडली. सुवर्णा मल्लप्पा मोने (वय 24) असे त्यांचे नाव आहे. रविवारी सकाळी त्या बेळगावला जात असताना हा अपघात झाला. सदर घटनेची नोंद संकेश्वर पोलिस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

दुचाकीवरील त्यांचे नियंत्रण सुटल्याने त्या खाली कोसळल्या. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आहे. कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी येथील अरिहंत शैक्षणिक संस्थेत त्या कन्नड विभागाच्या शिक्षिका होत्या. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT