Crime Pudhari
बेळगाव

Belgaum Crime: पत्नीचे अनैतिक संबंध, आयुर्वेद थेरपिस्टला झोपेच्या 3 गोळ्या; आईला संशय आल्यानं खुनाचा उलगडा

अनगोळमधील खुनाचा उलगडा : मृताच्या पत्नीसह प्रियकराचे पूर्वनियोजन

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : आधी अनैसर्गिक मृत्यू भासवण्याचा प्रयत्न केलेल्या बाबले गल्ली, अनगोळमधील आयुर्वेद थेरपिस्टचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अविनाश अशोक सुप्पण्णावर (वय 40, रा. बाबले गल्ली, तिसरा क्रॉस, अनगोळ) असे मृताचे नाव आहे.

या प्रकरणी कैलास बाळकृष्ण अच्चीताल (वय 43, रा. गजानन महाराजनगर, टिळकवाडी) व मृताची पत्नी लक्ष्मी अविनाश सुप्पण्णावर (वय 29, रा. बाबले गल्ली, तिसरा क्रॉस) अनगोळ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयासमोर उभे करुन त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अविनाश यांचे अनगोळमधील आंबेडकरनगरमध्ये अंकुश आयुवेर्दिक केअर सेंटर आहे. ते आयुर्वेद थेरपिस्ट म्हणून काम करत होते.

5 एप्रिल रोजी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या सेंटरला गेले. 6.30 ते ते 7.15 या पाऊण तासात ते त्यांच्या हॉस्पीटलमधील बेडवर निपचीत पडले होते. प्रथमदर्शनी हा अनैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न पत्नी लक्ष्मीने केला. पतीला हाय शुगर असल्याने ते पडल्याचे पोलिसांना सांगत याची फिर्याद नको, असे तिचे म्हणणे होते.परंतु, मृत अविनाशची आई कमल अशोक सुप्पण्णावर यांनी आपल्या मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणाचा तपास टिळकवाडीचे निरीक्षक परशुराम पुजेरी, महिला ठाण्याचे निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ व त्यांच्या पथकाने केला.

पूर्वनियोजित खून

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार संशयित कैलास व लक्ष्मी यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय गेल्या अनेक महिन्यांपासून अविनाशला होता. तो पत्नीवर सातत्याने संशय घेत होता. त्यामुळे पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढण्याचे कारस्थान रचले.

ज्या दिवशी अविनाश सेंटरला गेला असता कैलासने तेथे कोल्ड्रिंक सोबत नेले. यामध्ये झोपेच्या गोळ्यांच्या तीन स्ट्रिपमधील गोळ्या घालून अविनाशला प्यायला दिले. त्याला झोप येऊ लागल्याने तो जाऊन सेंटरमधील बेडवर जाऊन झोपला. यावेळी कैलासने त्याच्या डोकीत पाठीमागील बाजूस सिलिंडरने वार केला. यामुळे झोपेतच अविनाशचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT