fire incident 
बेळगाव

Belgaum fire incident: कृषी सेवा केंद्राला आग, ५० लाखांचे नुकसान

चिकोडी शहरात शॉर्टसर्किटमुळे घटना

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शॉर्टसर्किटने आग लागल्याने सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना चिकोडी शहरातील रविवार पेठ येथे घडली. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान शहरातील रविवार पेठ येथे असलेल्या गजानन माळी यांच्या मालकीच्‍या कृषी सेवा केंद्राला शॉर्टसर्किटने अचानक आग लागली.

बघताबघता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशके यासह इतर कृषी उत्पादने व औषधे जळून खाक झाली. त्यामुळे सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच चिकोडी अग्निशामक दलाचे जवान राचय्‍या मठपती, मेहबूब नदाफ, मल्लिकार्जुन कुंभार, कंटेप्‍पा माळगे, इरया हिरेमठ, उमेश नेर्लेकर, हैदर मुलतानी यांनी दोन तासांच्या अथक परिश्रमाने आग विझविली. अन्यथा इतर दुकानांनादेखील आग लागून मोठी हानी झाली असती. या घटनेमुळे चिकोडी शहरात खळबळ उडाली होती.लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. ग्रामीण भागातील संपर्क सुधारण्यासाठी राज्य सरकारने ‘प्रगतीपथ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT