Crime  Pudhari
बेळगाव

Belgaum Crime : अश्लीलता प्रचारकांना दणका

अल्पवयीन मुलांचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या १४ जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड करणाऱ्या १४ जणांविरोधात शहर सीईएन पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. लहान मुलांचे व्हिडीओ समाज माध्यमांवर पाठवण्यात आले असून, ते अश्लील असल्याने पोलिसांनी स्वतःहून ही कारवाई केली आहे. मूळ गुन्हेगारांची ओळख पटलेली नसल्याने ज्या मोबाईल क्रमांकावरून व मेल आयडीवरून हे व्हिडीओ व्हायरल झाले, त्या मोबाईल मालकांवर हा सु-मोटो गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजकाल कोणीही उठून सोशल मीडियावर रील्स्‌ बनवत आहे. अशा रील्स्‌ बनवताना काहीजण अल्पवयीन मुलांचे अश्लील व लैंगिक अत्याचारासंबंधीचे खासगी व्हिडीओ इन्स्टाग्राम व फेसबुक मेसेंजरवर व्हायरल करण्याचा प्रकार वाढला आहे. अशा लोकांचे मोबाईल शोधून त्या क्रमांकांचा उल्लेख करत एफआयआर दाखल केला आहे. असे बारा मोबाईल क्रमांक असून, ते कोणाचे आहेत, याचा शोध घेतला जाणार आहे. याशिवाय दोघांनी आपल्या जी-मेल खात्याचा वापर करत व्हिडीओ व्हायरल केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस अधिकारी काडय्या चरलिंगमठ यांनी स्वतःहून फिर्याद दिली असून, सीईएन पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. निरीक्षक श्रीशैल गाबी पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT