peacock File Photo
बेळगाव

Balekundri peacock rescue: बाळेकुंद्रीतून दोन मोरांची सुटका

बाळेकुंद्री खुर्दमध्ये (ता. बेळगाव) एका वृद्धाने आपल्या घरी पाळलेल्या दोन मोरांची रविवारी (दि. 12) सुटका करण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बाळेकुंद्री खुर्दमध्ये (ता. बेळगाव) एका वृद्धाने आपल्या घरी पाळलेल्या दोन मोरांची रविवारी (दि. 12) सुटका करण्यात आली. बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पथकाने हा उपक्रम राबविला. वनखात्याच्या मदतीने दोन्ही मोरांना भुतरामहट्टीतील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात सोडण्यात आले आहे.

सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, गजानन गवाणे, पद्मप्रसाद हुली, विकी मेहता, गौतम श्रॉफ, शशिकांत आंबेवाडकर, निलेश हिरेहोळ्ळी, मायकल पिंटो आदींचा समावेश असलेल्या पथकाने शनिवारी सकाळी बाळेकुंद्री खुर्द गाठले. त्या वृद्धाच्या निवासस्थानी भेट देऊन मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. त्याला बांधून ठेवणे कायद्याने गुन्हा आहे, असे सांगून त्याच्या ताब्यातील दोन मोर ताब्यात घेऊन वनखात्याकडे सुपूर्द केले. यासाठी वनखात्याच्या अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. प्राणीसंग्रहालयात सोडण्यापूर्वी दोन्ही मोरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT