बेळगाव : नियंत्रण सुटलेला ट्रॅक्टर रस्त्याकडेला उलटून झालेल्या अपघातात चालक ठार झाला. तर ट्रॅक्टरमध्ये बसलेला एकजण जखमी झाला. रविवारी (दि. 5) दुपारी बडाल अंकलगीत हा अपघात झाला. मारुती रुद्राप्पा अलाबादी (वय 24, रा. केएच बडस) असे मृत चालकाचे नाव आहे. तर बसाप्पा मल्लाप्पा कुडची (वय 52, रा. अंकलगी) जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मारुती हा ट्रॅक्टर घेऊन शेताकडे चालला होता. यावेळी त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रॅक्टर रस्त्याकडेला असलेल्या सखल जागेत जाऊन उलटला. या अपघातात मारुतीचा जागीच मृत्यू झाला तर बसाप्पा जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरु आहे.