fraud 
बेळगाव

Belgaum Financial Fraud: कोटी घेतले, ५० हजार परत दिले!

ना मुद्दल, ना व्याज; आझाद नगरच्या रहिवाशावर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : आपल्याकडे रक्कम दिल्यास चांगला लाभ मिळवून देतो, असे सांगून ९९ लाख ७० हजार रूपये घेतल्याची तक्रार काहींनी माळमारुती पोलिसात केली आहे. त्यानुसार शब्बीर सुलेमान शेख (रा. आझादनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

समीउल्ला अब्दुलमजीद पिरजादे याच्यासह अन्य काहींनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शब्बीर शेख याने आमच्याकडून २०२४ मध्ये उपरोक्त रक्कम घेतली. तुम्हाला मोठा लाभ मिळवून देतो, असे सांगून त्यांनी ही रक्कम उचलली होती. परंतु, त्याचा लाभही आणि मुद्दलही परत दिलेली नाही.

घेतलेल्या रक्कमेपैकी अवघी ५० हजाराची रक्कम दिली असून उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद करून घेतली असून निरीक्षक बी. आर. गड्डेकर तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT