कोंडसकोप्प : जागेच्या मालकीवरून वाद झाल्यानंतर जमलेला जमाव.  Pudhari File Photo
बेळगाव

जागेच्या मालकीवरून कोंडसकोप्प येथे हल्ला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बांधकामाची जागा सरकारी की खासगी, यावरून निर्माण झालेल्या वादातून एकावर हल्ला केल्याची घटना कोंडसकोप्प येथे घडली. यामध्ये गंगाप्पा कल्लाप्पा सांबरेकर (वय 36, रा. कोंडसकोप्प) हे जखमी झाले. यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांत पाचजणांविरोधात गुन्हा दाखल झाला. यामध्ये पुंडलिक यल्लाप्पा कुडचीकर, नागराज बाबू वाळके, विजय राजू सनदी, भीमा वाळप्पा देमण्णवर व मोनाप्पा यल्लाप्पा कुडचीकर (सर्वजण रा. कोंडसकोप्प) यांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांची माहिती अशी की, कोंडसकोप्प येथे गंगाप्पा हे कल्मेश्वर गल्ली येथे घर बांधत आहेत. यावेळी त्यांचे भाऊ विठ्ठल सांबरेकर व आई भरमव्वादेखील आली होती. यावेळी उपरोक्त सर्वजणांनी घटनास्थळी जाऊन घराची कागदपत्रे मागितली. यावेळी सांबरेकर यांनी ग्रामसेवक महांतेश अंगडकी यांना बोलावून घेत त्यांना कागदपत्रे दाखवली. परंतु, उपस्थितांनी वाद घालत सांबरेकर यांच्यावर हल्ला केला. यावेळी तेथे उपस्थित महिला भरमव्वा यांनी धक्काबुक्की केली. सर्व संशयितांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद सांबरेकर यांनी दिली आहे. घटनेची माहिती हिरेबागेवाडीचे उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर याची नोंद करून घेतली असून अविनाश ए. वाय. पुढील तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT