बेळगाव : पुढारी वृत्तसेवा; कृष्णा नदीच्या पातळीत घट झाल्यामुळे अलमट्टी धरणातून आज सोमवारी (दि. १८) रोजी पुन्हा दीड लाखांवरून सव्वालाख पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
गेले तीन दिवस या धरणातून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता, मात्र, आता कृष्णा नदीच्या पातळीत घट झाल्यामुळे आणि पावसाचा जोर ओसरल्यामुळे पुन्हा दीड लाख क्युसेकवरून सव्वा लाख क्युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. या धरणाची क्षमता १२३.१ टीएमसी असून सध्या या धरणामध्ये ८७ टीएमसी म्हणजे, ७१ टक्के पाणीसाठा आहे.
हेही वाचलंत का?