Almatti Dam 
बेळगाव

Almatti Dam : अलमट्टी जलाशय तुडुंब होण्याच्या मार्गावर

९८.५२ टक्के भरले : १८ हजार क्युसेक विसर्ग सुरु

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : कृष्णा नदीवरील अलमट्टी जलाशयात शुक्रवारी (दि. १४) दिवसभरात ४१,४७२ क्युसेक पाण्याची आवक सुरु असल्याने जलाशय तुडुंब होण्याच्या मार्गावर आहे. सध्या जलाशय ९८.५२ टक्के भरले असून १८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ६ पर्यंत जलाशयाची पातळी ५१९.५० मीटर इतकी झाली आहे. जलाशयाची कमाल पातळी ५१९.६० मीटर असून कमाल पाणीसाठा १२३.०८१ टीएमसी आहे. सध्या जलाशयात १२१.२६२ टीएमसी एकूण पाणीसाठा असून त्यापैकी १०३.६४२ टीएमसी जिवंत पाणीसाठा आहे.

जलाशयातील पाणीपातळी धोक्याच्या पातळीच्या जवळ पोचल्याने जलसंपदा अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जलाशयातून विसर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळे, लोकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT