बेळगाव

बेळगाव : ट्रॅक्टरखाली सापडून सव्वा वर्षाचे बालक ठार

दिनेश चोरगे

खानापूर; पुढारी वृत्तसेवा : रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या बालकाचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना तोलगी (ता. खानापूर ) येथे मंगळवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास घडली. विक्रांत चंद्रशेखर नायकर असे या बालकाचे नाव आहे.

विक्रांत शेजारील बालकांबरोबर घरात खेळत होता. खेळत खेळत तो घराबाहेर गेला. त्यावेळी शेताकडे जाणारा एक ट्रॅक्टर विक्रांतच्या घरासमोर येऊन थांबला. खेळत असताना विक्रात ट्रॅक्टरखाली येऊन बसला. अंधारामुळे ही बाब चालकाच्या निदर्शनास आले नाही, परिणामी ट्रॅक्टरखाली सापडून तो जागीच ठार झाला. याप्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT