15 Foot Python | दांडेलीजवळ आढळला ६० किलोंचा १५ फुटी अजगर 
बेळगाव

15 Foot Python | दांडेलीजवळ आढळला ६० किलोंचा १५ फुटी अजगर

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : कारवार जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील कोणपा गावात बेबी शेट्टी यांच्या शेतामध्ये शुक्रवारी सकाळी सुमारे १५ फूट लांबीचा आणि ६० किलो वजनाचा विशाल अजगर आढळून आला. यामुळे काही काळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

शेतात अजगर दिसताच शेतमालकांनी तात्काळ सर्पमित्र रजाक शहा तसेच स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. ही माहिती मिळताच रजाक शहा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अजगराचे यशस्वीपणे रेस्क्यू केले. हा अजगर गेल्या काही दिवसांपासून कोणपा शेत परिसरात फिरत होता. तेथील पक्षी व लहान प्राण्यांची शिकार करत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अजगराला पकडून घनदाट जंगलात मोकळे करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT