Latest

बीडच्या सचिन धसची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड

backup backup

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीडचा युवा क्रिकेटपटू सचिन संजय धस याने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात स्थान पटकावले. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच सचिन हा क्रिकेटचे धडे गिरवतोय. त्याच्या या यशाबद्दल अभिनंदन केले जात आहे.

सचिन धस याचे वडील संजय धस हे बीड येथे आरोग्य विभागात कार्यरत आहेत तर आई सुरेखा धस या पोलिस अधिकारी आहेत. सचिनला प्रारंभापासूनच क्रिकेटची आवड असल्याने त्याला बीडच्याच आदर्श क्रिकेट क्‍लबमध्ये सरावासाठी पाठवण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी त्याचे प्रशिक्षक अजहर सर यांनी त्याला मार्गदर्शन केले. सर्वात प्रथम सचिन हा चौदा वर्षाखालील राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत खेळला, तेव्हापासून त्याच्या यशाचा आलेख चढताच होता. प्रारंभी विभागीय स्तरावर खेळल्यानंतर त्याची चौथा वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड झाली. त्या ठिकाणीही चमकदार कामगिरी केल्याने त्याची आता आशिया कपसाठी भारताच्या 19 वर्षाखालील संघात स्थान मिळाले आहे.

त्याच्या या यशाबद्दल बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशच्यावतीने अध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, कार्याध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, सचिव आमेर सलीम, महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिजवान खान, आमेर सिद्दीकी, गोपाळ गुरखुदे, सुनील गोपीशेट्टी, सरफराज मोमीन, अतीक कुरेशी, अक्षय नरवडे, पठाण शाहरुख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वप्नपूर्तीची पहिली पायरी

सचिन धस याला प्रारंभापासून क्रिकेटची आवड असल्याने आई-वडीलांनीही त्याला या खेळासाठी प्रोत्साहन दिले. अभ्यासापेक्षाही क्रिकेटलाच प्राधान्य असायचे. सचिननेही पालकांचा हा विश्‍वास सार्थ ठरवला. त्याच्या निवडीने आता स्वप्नपूर्तीची पहिली पायरी गाठल्याची प्रतिक्रिया सचिनचे वडील संजय धस यांनी व्यक्त केली आहे. बीडसारख्या ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा नाहीत, त्या ठिकाणाहून एखादा खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करु शकतो, हेच सचिनच्या निमित्ताने दिसून आले असून त्याचे हे यश बीडच्या इतर खेळाडूंसाठीही प्रेरणायी ठरेल अशी प्रतिक्रिया संजय धस यांनी दिली.

कायम यशाकडे वाटचाल

सचिन धस याने प्रारंभापासूनच यशाची चव चाखली आहे. पालकांचा भक्कप पाठींबा आणि क्रिकेटमधील कौशल्य याच्या जोरावर त्याचा यशाचा आलेख चढताच राहिला. त्याच्या या यशाने आमच्या कष्टाचे सार्थक झाले, आहे, उत्तरोत्तर त्याने असेच यश मिळवत रहावे, एव्हढीच अपेक्षा असल्याचे संजय धस यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT