Latest

Koffee With Karan : ‘या’ कारणामुळे रणवीरवर जळतो टायगर

Arun Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : करण जोहरच्या (Koffee With Karan) शोमध्ये नुकतेच टायगर श्रॉफ आणि कृती सेनन आले होते. यावेळी दोघांनी दिलेल्या उत्तरातून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोघांनी 'हिरोपंती'मधून एकत्र पदार्पण केले होते आणि आता आगामी 'गणपत १' मध्येही ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. यावेळी कृतीने सांगितले की, 'हिरोपंती'मधून पदार्पण करण्यापूर्वी 'स्टुडंट ऑफ द इयर'साठी तिची ऑडिशन झाली होती आणि ती रीजेक्ट झाली होती. हे उत्तर ऐकून करणला आश्‍चर्याचा धक्‍का बसला, कारण तोच या चित्रपटाचा निर्माता होता.

या चित्रपटातून वरूण धवन, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा यांनी पदार्पण केले होते. दरम्यान, एका उत्तरात कृती म्हणाली की, टायगरने कधीच डेटिंगसाठी पुढाकार घेतला नाही आणि टायगर सारखा फ्लिप करत असतो. त्यामुळे त्याला डेट केले नसते, असेही तिने सांगितले. आणखी एका प्रश्‍नावेळी टायगर म्हणाला की, तो रणवीर सिंगवर जळतो, कारण त्याची पत्नी दीपिका पदुकोन आहे. ती टॅलेंटेड आणि सुंदर आहे.

'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) च्या नवव्या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला असून काही क्षणातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला पहायला मिळाला. पुढच्या भागात पाहुणे सेलिब्रिटी अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री क्रिती सेनन पहायला मिळणार आहेत.

दरम्यान या कार्यक्रमात कृती सेनन म्हणाली, 'मी जेव्हा मॉडेलिंग करायला सुरुवात केली तेव्हा स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटासाठी पहिल्यांदा ऑडिशन दिले होते. त्यामध्ये मला 'बहारा' आणि 'वेक अप सिड' मधील काही सीन्सवर डान्स करण्यास सांगितले होते. क्रितीने हे देखील उघड केले की त्या वेळी ती या चित्रपटासाठी तयार नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT