पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपसाठी बीसीसीआयचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी टीम इंडियाची घोषणा केली आहे. सध्या टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया चषक खेळत आहे. स्पर्धेतील भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होत आहेत. दरम्याने बीसीसीआयचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी श्रीलंकेत कर्णधार रोहित शर्मासोबत चर्चाकरून आज (दि.५) पत्रकार परिषद घेत भारतीय संघ जाहीर केला. (ICC World Cup 2023)
रोहित म्हणाला, "ODI क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जास्त वेळ असतो. T20 मध्ये तुमच्याकडे रणनीती बनवायला किंवा नवीन योजनांचा विचार करायला वेळ नसतो. हे फक्त आमच्यासोबत नाही. प्रत्येक टीमसोबत आहे. प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये असे घडते. काही खेळाडू संघात स्थान मिळवू शकत नाहीत.
स्पर्धेसाठी आम्हाला सर्वोत्तम संघ निवडायचा आहे आणि अशा परिस्थितीत आम्हाला कोणाला तरी संघाबाहेर ठेवावे लागेल. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये संघात खोली हवी आहे. गेल्या काही वर्षात संघात याची कमतरता आहे. अनेक प्रसंगी आम्हाला असे वाटले की, आमच्या संघात फलंदाजीची खोली नाही. नवव्या, दहाव्या किंवा अकराव्या क्रमांकावरील खेळाडूंचे काम फक्त गोलंदाजी करणे नाही आहे. अनेक प्रसंगी हेच खेळाडू १०-१५ धावा करतात. यामुळे विजय आणि पराभव यातील फरक सिद्ध होतो.
अजित आगरकर म्हणाले, "दुखापतीच्या समस्यामुळे अनेक खेळाडू संघातून बाहेर आहेत. पण, श्रेयस आणि राहुल योग्य वेळी तंदुरुस्त झाले. संघ निवडीसाठी अनेक नावांची चर्चा झाली. पण, संघाच्या संतुलनानुसार सर्वोत्तम संघ निवडायचा असतो. केएल राहुल बंगळुरूमध्ये फॉर्म चांगला होता. परंतु आशिया चषकापूर्वी त्याला दुखापत झाली.
ODI World Cupसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन, सूर्यकुमार यादव.