मुनमुन दत्ता 
Latest

Munmun Dutta : मुनमुन दत्ताने टप्पूशी केला साखरपुडा? काय म्हणाली, ‘तारक मेहता’ची बबीता?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जवळपास १६ वर्षे टीव्ही इंडस्ट्रीत काम केल्यानंतर मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधून लोकप्रिय ठरलेली बबीता जी ही भूमिका प्रसिद्ध ठरली. (Munmun Dutta) वादामुळे ही टीव्ही मालिका नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.आता पुन्हा एकदा या मालिकेतील पात्रे चर्चेत आली आहेत. या मालिकेची अभिनेत्री मुनमुन दत्त म्हणजेच 'बबीता जी' आणि राज अनादकट म्हणजेच 'टप्पू' यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली. मुनमुन दत्ता आणि राज अनादकट विषयी सोशल मीडियावर माहिती समोर आली आहे की, दोघांनी साखरपुडा केला आहे. (Munmun Dutta)

त्यानंतर हे वृत्त खूप व्हायरल झाले. त्यानंतर दोन्ही स्टार्सना आपले स्टेटमेंट जारी करावं लागलं. मुनमुन दत्ता आणि राज अनादकटच्या दोन्ही टीमनी स्टेटमेंट जारी करून या केवळ अफवा असल्याचे सांगितले. मुनमुन दत्ता आणि राज अनादकट यांच्या साखरपुड्याचे वृत्त हे अफवा असल्याचे समोर आल्यानंतर 'बबीता जी' आणि 'टप्पू' यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून कयास लावला जात आहे की, दोघांचे आधीच लग्न झाले आहे.

जेठालाल-अय्यरवर मीम्स

मुनमुन दत्ता – राज अनादकट यांच्या साखरपुड्याचे वृत्त समोर आल्यानंतर सोशल मीडिया खूप ॲक्टिव्ह झाले. त्यामुळे सोशल मीडियावर खूप मीम्स व्हायरल होताना दिसले. काही मीम्स जेठालाल तक काही अय्यरवर जोक्स बनवण्यात आले. आणखी एका फोटो लहान 'टप्पू' 'बबीता जी'ला हळद लावताना दिसत आहेत.

अभिनेत्री मुनमुन दत्ताने हे वृत्त एकदम खोटे असल्याचे म्हटले आहे. मुनमुनने एखा मीडियाशी बोलताना सांगितले की, साखरपुड्याचे वृत्त एकदम खोटे आहेत. यामध्ये जरादेखील तथ्य नाही. मी अशा खोट्या वृत्तावर एनर्जी आणि लक्ष देऊ इच्छत नाही…"

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT