पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने शानदार शतकी खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. बाबरने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 115 चेंडूत 105 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 12 चौकार मारले.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 210 धावा केल्या, त्यानंतर पाकिस्तानने 1 विकेट गमावून 37.5 षटकात हे लक्ष्य सहज गाठले. बाबरशिवाय इमाम-उल हकने 100 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकारासह 89 धावा केल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला सामनावीर आणि मालिकावीराचा किताब देण्यात आला. बाबरचे हे वनडेतील 16 वे शतक आहे. एकदिवसीय कारकिर्दीतील 16 व्या शतकासह पाकिस्तानी कर्णधाराने विश्वविक्रम केला आहे.
बाबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 16 शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. असे करून त्याने सर्व दिग्गजांचा पराभव केला आहे. बाबरने आपल्या कारकिर्दीत केवळ 84 एकदिवसीय डावात 16 शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. हाशिम अमलाने 94 एकदिवसीय डाव खेळून आपल्या कारकिर्दीत 16 शतके झळकावण्यात यश मिळवले.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने 110 डावात 16 शतके झळकावण्याची अप्रतिम कामगिरी केली. याशिवाय डेव्हिड वॉर्नरने कारकिर्दीत 110 डाव खेळले होते, जेव्हा त्याचे कारकिर्दीतील 16 वे शतक झळकले होते. एवढेच नाही तर बाबरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडेतही शतक झळकावले, जे त्याच्या कारकिर्दीतील 15 वे शतक होते. बाबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 15 शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा बाबर हा दुसरा पाकिस्तानी फलंदाज ठरला आहे. बाबरच्या नावावर आता 16 शतके आहेत. पाकिस्तानसाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावण्याचा विक्रम सईद अन्वरच्या नावावर आहे. अन्वरने आपल्या कारकिर्दीत 20 शतके झळकावली आहेत. म्हणजेच बाबर फार कमी कालावधीत पाकिस्तानी क्रिकेटचा बादशहा बनणार आहे.
बाबर आझमची सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा होत आहे. पाकिस्तानचा माजी सलामीवीर अन्वरने 20 शतके झळकावण्यासाठी एकूण 247 सामने खेळले ज्यात त्याने 244 डाव खेळले. म्हणजेच बाबरने अशाच प्रकारे धावा करत राहिल्यास तो दिवस दूर नाही जेव्हा तो पाकिस्तानातच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनेल.
हे ही वाचलं का ?