Ayodhya Ram temple 
Latest

Ayodhya Ram temple | अयोध्येतील राम मंदिर जानेवारी २०२४ मध्ये भाविकांसाठी खुले होणार

दीपक दि. भांदिगरे

अयोध्या : पुढारी ऑनलाईन; अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram temple) जानेवारी २०२४ मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. मंदिर भूकंप-प्रतिरोधक आणि १ हजार वर्षांहून अधिक काळ टिकेल इतके मजबूत असेल, अशी त्याची बांधणी केली जात असल्याचे रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी मंगळवारी सांगितले.

३९२ खांब आणि १२ दरवाजे असणारे हे मंदिर लोखंडी सळ्यांचा वापर न करता बांधले जात आहे. दगड जोडण्यासाठी लोखंडाऐवजी तांब्याच्या चिप्सचा वापर केला जात असल्याचे ट्रस्टच्या सदस्यांनी सांगितले आहे. मुख्य मंदिराचा आकार ३५०x२५० फूट असेल, असे राय म्हणाले. १,८०० कोटी रुपये खर्चून मंदिराची उभारणी केली जात आहे. ५० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. कामाचा वेग आणि दर्जा यावर आम्ही समाधानी आहोत, असे राय म्हणाले.

गर्भगृहात १६० खांब असतील तर पहिल्या मजल्यावर ८२ खांब असतील. मंदिराचे एकूण १२ प्रवेशद्वार सागवान लाकडापासून बनवलेले असतील. त्याचबरोबर मंदिरात 'सिंह द्वार', नृत्य मंडप, रंग मंडप असेल. २.७ एकर परिसरात उभारण्यात येत असलेल्या मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानातून आणलेले ग्रेनाइट दगड वापरले जात आहेत.

प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे यांनी सांगितले की, रामनवमीच्या दिवशी रामलल्लाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतील अशा पद्धतीने गर्भगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. (Ayodhya Ram temple)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT