Latest

Ayodhya Ram Mandir LIVE | ५०० वर्षांची प्रतिक्षा संपली, अयोध्येत रामराज्य… मंदिरात रामलल्ला विराजमान

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाला असून त्यासोबतच लोकांची सुमारे ५०० वर्षांपासूनची प्रतिक्षाही संपली आहे. रामलल्ला गर्भगृहात विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात दुपारी १२.२९ च्या शुभमुहूर्तावर राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. ८४ सेकंदाच्या अद्भूत मुहूर्तामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 'शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर, अभूतपूर्व संयम, अगणित त्याग आणि तपश्चर्येनंतर आपल्या प्रभू रामाचे आगमन झाले आहे,' अशा भावना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.

Ayodhya Ram Mandir LIVE |

२२ जानेवारी २०२४ चा सूर्य एक तेजस्वी प्रकाश घेऊन आलाय – PM मोदी

२२ जानेवारी २०२४ चा सूर्य एक तेजस्वी प्रकाश घेऊन आला आहे. ही कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही, तर ती काळाच्या नवीन चक्राची उत्पत्ती आहे. आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाही. ते आता या दिव्य मंदिरात राहणार आहेत, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर बोलताना व्यक्त केला.

माझा ठाम विश्वास आणि अपार श्रद्धा आहे की, जे काही घडले आहे, त्याची अनुभूती देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील रामभक्तांना नक्कीच होत आहे. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत. शतकानुशतके अभूतपूर्व धैर्य, अगणित बलिदान, त्याग आणि तपश्चर्येनंतर आपल्या प्रभूरामांचे आगमन झाले आहे. या शुभप्रसंगी तुम्हा सर्वांना आणि तमाम देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. मी गर्भगृहात दैवी चैतन्याचा साक्षीदार बनूव तुमच्यासमोर उपस्थित आहे. सांगण्यासारखे बरेच काही आहे, पण कंठ दाटून येतो, मन भरून आले आहे. आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाही. आमचे रामलल्ला आता दिव्य मंदिरात राहणार आहेत. हा क्षण अलौकिक आहे. हा क्षण सर्वात पवित्र आहे. हे वातावरण, ह्या क्षणी आपल्या सर्वांवर प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आहे, असे पीएम मोदी म्हणाले.

'संपूर्ण देश 'राममय"

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा झाल्याने संपूर्ण देश 'राममय' झाला आहे. असे दिसते की आपण त्रेतायुगातच प्रवेश केला आहे. आम्ही राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता तिथेच ते बांधले आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

राम मंदिरात रामलल्ला विराजमान

पंतप्रधान मोदींच्या हस्ते राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात १२.२९ च्या शुभमुहूर्तावर राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

PM मोदी चांदीची छत्री घेऊन गर्भगृहात पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी चांदीचे छत्र घेऊन राम मंदिराच्या गर्भगृहात पोहोचले. यासोबतच प्राणप्रतिष्ठा विधीही सुरू झाला आहे.

रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या पूजाविधीला प्रारंभ

अमित शहांनी दिल्लीतील लक्ष्मी नारायण मंदिरात केली पूजा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त दिल्लीतील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात पूजा केली. या मंदिराला बिर्ला मंदिर म्हणूनही ओळखले जाते.

प्राणप्रतिष्ठा विधीला प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर परिसरात पोहोचले आहेत. प्राणप्रतिष्ठा विधीला प्रारंभ झाला असून  ते रामलल्लाची पूजा करतील. मोदींसह देशभरातील ११ दाम्पत्यांना पूजेचा मान मिळणार आहे. अयोध्येतील तात्पुरत्या मंदिरातून रामलल्लाला नवीन मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आले आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे हवाई दृश्य.

राममय नेपाळ

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापूर्वी नेपाळमधील जानकी मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले.

पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले आहेत.

संघप्रमुख मंदिर परिसरात उपस्थित

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात पोहोचले आहेत. त्याचवेळी, माजी पंतप्रधान आणि जेडीएस प्रमुख एचडी देवेगौडा देखील मंदिर परिसरात उपस्थित आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील थोड्याच वेळात पोहोचणार आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येला पोहोचले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत पोहोचले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत योगीही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. आज सकाळी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून राम मंदिराच्या अभिषेकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले होते, 'श्री रामललाच्या नवीन मूर्तीच्या अभिषेक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी येणार्‍या सर्व अतिथी मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन.

अमेरिकेतही राम नामाचा गजर

अमेरिकेतील भारतीय डायस्पोरा 'प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या आधी मिनेसोटाच्या हिंदू मंदिरात राम भजनात रंगले होते.

लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी

आरतीच्या वेळी, सर्व पाहुण्यांच्या हातात एक घंटा असेल, जी आरतीच्या वेळी सर्व पाहुणे वाजवतील. आरतीदरम्यान लष्कराचे हेलिकॉप्टर अयोध्येत पुष्पवृष्टी करतील. कॅम्पसमध्ये ३० कलाकार वेगवेगळी भारतीय वाद्ये वाजवत राहतील.

माधुरी दीक्षित नेने आणि जॅकी श्रॉफ प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येला रवाना.

अयोध्यानगरी राम भक्तांनी गजबजली

राम चरण नंतर चिरंजीवीही अयोध्येत

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते राम चरण यांच्यानंतर आता प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिरंजीवीही हैदराबादहून अयोध्येला रवाना झाले आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हे दोन्ही कलाकार अयोध्येत पोहोचले आहेत.

इस्रायलच्या राजदूतांनी दिल्या शुभेच्छा

इस्रायलचे भारतातील राजदूत नॉर गिलॉन यांनी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, 'राम मंदिराच्या अभिषेक निमित्त मी भारतवासीयांना हार्दिक शुभेच्छा देतो. जगभरातील भाविकांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. अयोध्येतील राम मंदिराला भेट देण्यासाठी मी उत्सुक आहे.

पंतप्रधान मोदी सकाळी 10.25 वाजता महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील

पंतप्रधान मोदी सकाळी १०.२५ वाजता अयोध्या धामच्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. १०.४५ वाजता ते अयोध्या हेलिपॅडवर पोहोचतील. येथून ते थेट रामजन्मभूमी स्थळी पोहोचतील. यानंतर सकाळी ११ ते दुपारी 12 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमात सहभागी होणार असून, दुपारी 12.05 ते 12.55 या वेळेत प्राणप्रतिष्ठा आयोजित करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता कार्यक्रम संपल्यानंतर ते कार्यक्रमस्थळी पोहोचतील, जिथे इतर विशेष पाहुण्यांसोबत ते संपूर्ण देश आणि जगाला संबोधित करतील. सीएम योगीही येथे भाषण करणार आहेत.

अप्रतिम, अविस्मरणीय, अलौकिक क्षण!

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आश्चर्यकारक, अविस्मरणीय, अलौकिक क्षण! आज, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीत आराध्य प्रभू श्री राम यांचे पवित्र जन्मस्थान असलेल्या श्री अयोध्या धाममध्ये भगवान श्री रामलला यांच्या नवीन मूर्तीच्या अभिषेकाचा विधी पूर्ण होत आहे. आज पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली असंख्य रामभक्तांची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. श्रद्धा आणि भक्तीच्या सागरात तल्लीन होऊन अवघा देश 'राममय' झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT