Ayesha Jhulka 
Latest

Ayesha Jhulka : अभिनेत्री आयशा झुल्काची मुंबई हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री आयशा जुल्काने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. तिच्या पाळीव कुत्र्याला 'रॉकी' या तिच्या केअरटेकरने मारल्याचा आरोप करत तिने त्वरीत न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. (Ayesha Jhulka) आयशाचा पाळीव कुत्रा १३ सप्टेंबर, २०२० रोजी पाण्याच्या टाकीत बुडून मेल्याचे तिच्या लोणावळा येथील बंगल्यात काम करणाऱ्या केयरटेकरने सांगितले होते. पण, संशय आल्याने ती कोर्टात गेली होती. चार वर्षानंतरही न्याय मिळत नसल्याने आयशाने आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. (Ayesha Jhulka)

आयशा जुल्काला शंका आल्याने तिने रॉकीचे शव पोस्टमार्टमसाठी पाठवले. पशुवैद्यांनी असे सांगितले की, कुत्र्याचा मृत्यू गुदमरल्याने वा गळा दाबून झाला आणि त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे येथे काही आढळत नाही.

त्यानंतर आयशाने १७ सप्टेंबर, २०२० रोजी एफआयआर नोंदवला आणि काही दिवसांनंतर केयरटेकर राम नाथू आंद्रे यांनी कथितपणे पोलिसांसमोर कबूल केले की, त्याने मद्यधुंद अवस्थेत कुत्र्याचा गळा दाबला होता. त्याला २५ सप्टेंबर रोजी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. मात्र दोन दिवसांनी जामीन मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणी मावळ पोलिसांनी ७ जानेवारी, २०२१ रोजी आरोपपत्रही दाखल केले होते. फेब्रुवारी, २०२१ मध्ये झुल्काने एक अर्ज दाखल केला होता.

तपासादरम्यान, रक्ताने माखलेली चादर पुण्यातील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली होती. आणि आतादेखील रिपोर्टची प्रतीक्षा आहे. आयशा जुल्काच्या कायदेशीर टीमला तोंडी सांगण्यात आले की, रिपोर्ट एकत्र करण्यासाठी कोणताही कर्मचारी उपलब्ध नव्हता. आयशाने याचिकेत म्हटले आहे की, या खटल्याला चार वर्षे उलटले आहेत. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. सुनावणी प्रलंबित असल्याचे तिने म्हटले आहे. झुल्का यांनी अभियोग संचालनालय, मुंबईकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी काहीही हालचाल न झाल्याने तिने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

हेदेखील वाचा – 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT