सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यात राबवलेल्या ऑपरेशन परिवर्तन यात केलेल्या कामांची दखल घेऊन हा पुरस्कार तेजस्वी सातपुते यांना जाहीर केला आहे.
पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, तत्कालीन पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी त्याच्या सेवा कालावधीत जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री बंद करण्यासाठी 'ऑपरेशन परिवर्तन' हा उपक्रम हाती घेतला होता. त्यामध्ये त्यांनी हातभट्टी दारू व्यवसाय करणारे 737 लोकांचे परिवर्तन करून कायदेशीर व्यवसाय सुरू केले होते. त्यांच्या या कामाची केंद्र सरकारच्या "गृह विभागा" कडून दखल घेतली आहे.
गृह विभागाशी निगडित असलेल्या ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट, गृह विभाग दिल्ली (BPRND) कडून संरक्षण दलातील नावीन्यपूर्ण कामासाठी 'सन्मान चिन्ह' प्रदान करण्यात येते. यावर्षी BPRND तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर जिल्ह्यात राबवलेल्या ऑपरेशन परिवर्तन यात केलेल्या कामांची दखल घेऊन हा पुरस्कार तेजस्वी सातपुते यांना जाहीर केला आहे.