Latest

Snake inside dead body : शवविच्छेदन करताना शरीरात आढळला जिवंत साप!

Arun Patil

न्यूयॉर्क : शवविच्छेदन किंवा पोस्टमार्टेमबद्दल लोकांच्या मनात भीती असते. अनेक जणअशा ठिकाणांपासून दूर राहणे पसंत करतात. तथापि, डोक्यात कोणताही विचार न ठेवता काही लोक या ठिकाणी काम करत असतात. शवविच्छेदन प्रक्रियेमध्ये सहभागी लोकांनाही कधी कधी असे काही अनुभव येतात, जे ऐकून सर्वसामान्य माणूस हादरून जातो. असेच एक विचित्र प्रकरण अमेरिकेतील मेरीलँडमधून समोर आले आहे. या ठिकाणी शवविच्छेदन तंत्रज्ञांना मृतदेहाच्या आत जिवंत साप आढळला आणि ते द़ृश्य पाहून त्यांची बोबडीच वळाली. ( Snake inside dead body )

शवविच्छेदन गृहात काम करणार्‍या 31 वर्षीय जेसिका लोगानने याच कामाशी निगडित एक भीतीदायक अनुभव सांगितला आहे. तिला एका मृत माणसाच्या मांडीत जिवंत साप दिसला होता. गेल्या नऊ वर्षांपासून ती शवविच्छेदन तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे; मात्र हा अनुभव तिच्यासाठी खूप भीतीदायक होता. शवविच्छेदन करत असताना अचानक मृतदेहाच्या मांडीतून सापाने उसळी घेतली. त्यानंतर जेसिका किंचाळली आणि आरडाओरड करत खोलीतून बाहेर पळून गेली.

Snake inside dead body : व्यक्तीच्या मृत्यूनंतर साप त्याच्या शरीरात शिरला

सापाला पकडून बाहेर सोडल्याशिवाय ती त्या खोलीत परत आली नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर साप त्याच्या शरीरात शिरला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत बिकट होती. कारण, मृतदेह एका नाल्यात आढळून आला होता. खरे तर मृत व्यक्ती कोणत्या स्थितीत सापडते यावर मृतदेहाची स्थिती अवलंबून असते. जर शव कोरडे आणि थंड असेल तर त्यात सहसा जास्त कीटक आढळत नाहीत. जर ते उष्ण आणि दमट असेल तर शरीरात खूप जंतू असतात. मात्र, कर्मचार्‍यांना भीती बाजूला ठेवून आपले काम करावेच लागते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT