Latest

Glenn Maxwell Accident : ग्लेन मॅक्सवेलचा अपघात! बर्थडे पार्टीत मस्ती करताना…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Glenn Maxwell Accident : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. हा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडूचा पाय फ्रॅक्चर झाला असून तो बराच काळ मैदानाबाहेर राहणार आहे. रिपोर्ट्सनुसार, मॅक्सवेल एका मित्राच्या बर्थडे पार्टीला गेला होता, तेव्हा तेथे तो घसरून पडला. त्या दुर्घटनेत मॅक्सवेलचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान, यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे.

34 वर्षीय मॅक्सवेलवर (Glenn Maxwell Accident) रविवारी शस्त्रक्रिया झाली. शनिवारी तो आणि त्याचे मित्र घरामागील अंगणात धावत असताना हा अपघात झाला. दोघे घसरले आणि पडले. मॅक्सवेलचा पाय दुसऱ्या माणसाच्या पायाखाली आला. दोघांपैकी कोणीही दारूच्या नशेत नव्हते आणि इतर कुणाला दुखापतही झालेली नाही. ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली म्हणाले, ग्लेनला बरे वाटत आहे. हा एक दुर्दैवी अपघात होता आणि तो गेल्या काही सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी करत होता. त्याच्या दुखापतीमुळे संघाला धक्का बसला आहे.'

मॅक्सवेल बिग बॅश लीगमध्ये खेळू शकणार नाही

'ग्लेन हा पांढर्‍या चेंडूच्या क्रिकेटमधील आमच्या संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. तो लवकर तंदुरुस्त व्हावा यासाठी आम्ही प्रार्थना करत आहे. मॅक्सवेलच्या जागी सीन अॅबॉटचा वनडे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. मॅक्सवेल बिग बॅश लीगमध्येही खेळू शकणार नाही. याशिवाय, तो डिसेंबरच्या सुरुवातीला शेफिल्ड शिल्डमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघाकडून खेळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. (Glenn Maxwell Accident)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT