Latest

Australia vs New Zealand : रचिन-निशमची झूंज व्‍यर्थ! ऑस्‍ट्रेलियाचा न्‍यूझीलंडवर ५ धावांनी विजय

दिनेश चोरगे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  एकदिवसीय विश्वचषक स्‍पर्धेतील २७ वा सामना आज (दि.२८) धर्मशाला येथे ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड झाला. संपूर्ण सामन्‍यांवर फलंदाजांचे वर्चस्‍व राहिले. ३८९ धावांचा पाढलाग करताना न्‍यूझीलंडचा स्‍टार फलंदाज रचिन रवींद्रने ७७ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकाराच्‍या मदतीने धडाकेबाज शतकी खेळी यांनतर निशमचे झंझावती अर्धशतक व्यर्थ ठरले. यानंतर अखेर ५ धावांनी ऑस्‍ट्रेलियाने न्‍यूझीलंडवर विजय मिळवला. या विजयाने ऑस्‍ट्रेलिया आणखी दोन गुण आपल्‍या नावावर केले आहेत. तर हा न्‍यूझीलंड या स्‍पर्धेतील दुसरा पराभव ठरला आहे. (NZ vs AUS)  या सामन्यात दोन्ही डावात मिळून ७७१ धावांची खेळी क्रिकेटप्रेंमीना पहायला मिळाली.

ऑस्ट्रेलियाचे न्यूझीलंडला ३८९ धावांचे लक्ष्य

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. ट्रॅव्हिस हेडने विश्वचषकातील पहिला सामना खेळताना अवघ्या ५९ चेंडूत शतक झळकावले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे चौथे शतक होते. डोक्याला दुखापत झाल्याने तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नाही. त्याने वॉर्नरसोबत पहिल्या विकेटसाठी ११७ चेंडूत १७५ धावांची भागीदारी केली होती. हेडने ६७ चेंडूत १० चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १०९ धावांची खेळी केली. त्याचवेळी वॉर्नर ६५ चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ८१ धावा करून बाद झाला.

स्टीव्ह स्मिथही १८ धावा करून माघारी परतला. ग्लेन फिलिप्सने या तिन्ही विकेट घेतल्या. मिचेल मार्श ३६ धावा करून बाद झाला तर मार्नस लॅबुशेन १८ धावा करून बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने २४ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४१ धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी जोश इंग्लिशने २८ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३८ धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने १४ चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. ४९ व्या षटकात ट्रेंट बोल्टने एकाच षटकात तीन बळी घेतले. इंग्लिश आणि कमिन्सशिवाय त्याने झाम्पाला बाद केले. त्यानंतर ५० व्या षटकात मॅट हेन्रीने मिचेल स्टार्कला नीशमकडे झेलबाद केले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव ३८८ धावांवर संपवला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी तीन बळी घेतले., मिचेल सँटनरने दोन विकेट घेतल्या तर हेन्री आणि नीशम यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

वॉर्नरचे ३२ वे अर्धशतक

वॉर्नरने २८ चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ३२ वे अर्धशतक झळकावले. यापूर्वी त्याने श्रीलंका आणि नेदरलँड्सविरुद्ध शतके झळकावली होती. आठ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता ९३ धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेडनेही २५ चेंडूत त्याचे १६ वे अर्धशतक केले.

ट्रॅव्हिस हेडचे ५९ चेंडूत शतक

ट्रॅव्हिस हेडने विश्वचषक २०२३ चा पहिला सामना खेळताना केवळ ५९ चेंडूत शतक झळकावले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे चौथे शतक आहे. दुखापतीमुळे तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नाही. आता त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याने वॉर्नरसोबत पहिल्या विकेटसाठी ११७ चेंडूत १७५ धावांची भागीदारी केली. ५९ चेंडूतील शतक हे या विश्वचषकातील तिसरे जलद शतक आहे. ग्लेन मॅक्सवेलने ४० चेंडूत शतक तर एडन मार्करामने ४९ चेंडूत शतक झळकावली आहेत.

न्यूझीलंडची आश्‍वासक सुरुवात

ऑस्‍ट्रेलियाने दिलेल्‍या ३८९ धावांचे लक्ष्‍याचा पाठलाग करताना न्‍यूझीलंडने आश्‍वासक सुरुवात केली. न्यूझीलंडला पहिला धक्का आठव्या षटकात ६१ धावांवर बसला. जोश हेझलवूडने डेव्हन कॉनवेला मिचेल स्टार्ककरवी झेलबाद केले. त्याने 17 चेंडूत 28 धावा करता आल्या. यानंतर ७२ धावांवर न्‍यूझ्रीलंडने विल यंगही तंबूत परलता त्‍याला जोश हेझलवूडने त्याला मिचेल स्टार्ककरवी झेलबाद केले. त्‍याने 37 चेंडूत 32 धावा केल्या.

डॅरिल मिशेलची अर्धशतकी खेळी

दोन गडी बाद झाल्‍यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी आपल्‍या आश्‍वासन फलंदाजीने न्‍यूझीलंडचा डाव सावरला. मिशेलने ६ चौकार आणि एका षटकाराच्‍या मदतीने ४२ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्‍या.  २४ व्‍या षटकातील अखेरच्‍या चेंडूवर झाम्‍पाने स्‍टार्क करवी मिचेलला झेलबाद केले. मिचेल याने ५१ चेंडूत ५४ धावा केल्‍या यामध्‍ये ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.२४ व्‍या षटकातील अखेरच्‍या चेंडूवर झाम्‍पाने स्‍टार्क करवी मिचेलला झेलबाद केले. मिचेल याने ५१ चेंडूत ५४ धावा केल्‍या यामध्‍ये ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

रचिन रवींद्रचे धडाकेबाज शतक

रविंद्रने ७७ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकाराच्‍या मदतीने धडाकेबाज शतकी खेळी केली. ३२ व्‍या षटकात न्‍यूझीलंडला चौथा धक्‍का बसला. कर्णधार लॅथम याला झाम्‍पाच्‍या गोलंदाजीवर हेझलवूडने झेलबाद केले. लॅथम याने २२ चेंडूत दोन चौकाराच्‍या मदतीने २१ धावा केल्‍या. ४१ व्‍या षटकामध्‍ये रचिन रवींद्रला कमिन्‍सने लॅबुशेनकरवी झेलबाद केले. रवींद्रने ८९ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्‍या मदतीने दमदार ११६ धावांची खेळी केली.एकीकडे रचिन रवींद्र ऑस्‍ट्रेलियाला कडवी झूंज देत असताना न्‍यूझीलंडचा फलंदाज बाद होण्‍याचा क्रम सुरुच राहिला आहे. ३७ व्‍या षटकामध्‍ये ऑस्‍ट्रेलियाचा फिरकीपटू मॅक्‍सवेलने ग्‍लेन फिल्‍पिस याला लबुशेनकरवी झेलबाद केले. त्‍याने १६ चेंडूत एका चौकाराच्‍या मदतीने १२ धावा केल्‍या.

न्‍यूझीलंडला माेठा धक्‍का रचिन रवींद्र आऊट

एकीकडे रचिन रवींद्र ऑस्‍ट्रेलियाला कडवी झूंज देत असताना न्‍यूझीलंडचा फलंदाज बाद होण्‍याचा क्रम सुरुच राहिला आहे. ३७ व्‍या षटकामध्‍ये ऑस्‍ट्रेलियाचा फिरकीपटू मॅक्‍सवेलने ग्‍लेन फिल्‍पिस याला लबुशेनकरवी झेलबाद केले. त्‍याने १६ चेंडूत एका चौकाराच्‍या मदतीने १२ धावा केल्‍या. न्‍यूझीलंडने ४० षटकांमध्‍ये ५ गडी गमावत २९२ धावा केल्‍या आहेत. ४१ व्‍या षटकामध्‍ये रचिन रवींद्रला कमिन्‍सने लॅबुशेनकरवी झेलबाद केले. रवींद्रने ८९ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्‍या मदतीने दमदार ११६ धावांची खेळी केली.

जेम्‍स नीशमचे झंझावती अर्धशतक

रचिन रवींद्रची बाद झाल्‍यानंतर जेम्स नीशमने आकर्षक पटकेबाजी करत न्‍यूझीलंडचे आव्‍हान जिंवत ठेवण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र ४७ व्‍या षटकात कमिन्‍सने . मॅट हेन्रीला हॅझलवूड करवी झेलबाद केले. त्‍याने ८ चेंडूत ९ धावा केल्‍या. नीशमने ३२चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्‍या मदतीने अर्धशतक केले. मात्र अखेरच्‍या षटकात न्‍यूझीलंडला विजय मिळवून देण्‍यात त्‍याला यश आले नाही. नीशम ५८ धावांवर धावचीत झाला आणि अत्‍यंत रोमहर्षक सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाने न्‍यूझीलंडचा पराभव केला.

ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने तीन विकेट घेतल्या. जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलिया संघ : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

न्यूझीलंड संघ : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT