औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा
कोरोनाचा नवा व्हेरियंट असणाऱ्या ओमायक्रॉनचा औरंगाबाद शहरात शिरकाव झाला आहे. इंग्लंडवरून आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीला आणि दुबईहून आलेल्या सिडकोतील ३३ वर्षीय युवकाला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे तपासणीतून समोर आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली आहे.
इंग्लडवरुन आलेल्या औरंगाबादमधील एका युवतीला मुंबईत आल्यानंतर ओमायक्रॉनची लागण झाली. तिथेच तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. चाचणीत तिच्या वडिलांचा काेराेना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. ते औरंगाबादमध्ये 20 तारखेला आले असता, त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. याची दखल घेवून त्यांचा स्वॅब तात्काळ जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यांना ओमायक्रॉनची लागन झाल्याचे दिसून आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दुबईहून 17 डिसेंबरला शहरात आलेल्या सिडकोतील एका युवकाला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे आजच स्पष्ट झाले. खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र ओमायक्रॉनचा अहवाल पॉझिटीव्ह येताच आरोग्य यंत्रणा पुन्हा त्याचा शोध घेत आहे.
हेही वाचलं का?