Latest

Russia-Ukraine War : रशियाला एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू; जाणून घ्या १० महत्त्वाच्या गोष्टी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर (Russia-Ukraine War) जगभरातील इतर देशांची नाराजी रशिया ओढवून घेताना दिसत आहे. तर युक्रेनला मोठ्या प्रमाणात अमेरिका, जर्मनी, कॅनडा देशांकडून शस्त्रास्त्रांची मदत पुरवली जात आहे. तर दुसरीकडे रशियाला जगाच्या पातळीवर एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर या महत्वपूर्ण घटनेतील १० महत्त्वाच्यागोष्टी पाहुयात…

१) कीवमध्ये कर्फ्यू कडक करण्यात आला आहे. कर्फ्यू तोडणाऱ्याला व्यक्तीवर दुश्मनासारखी कारवाई केली जाईल, असा आदेशच युक्रेनने काढला आहे.

२) जर्मनीने राॅकेल लाॅंचसाठी संपूर्ण मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

३) अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रं खरेदी करण्यासाठी ३५ करोड डाॅलर्सची मदत केली आहे.

४) जर्मनी आणि पश्चिमी मित्र राष्ट्रांनी SWIFT प्रणालीतून रशियाला बाहेर काढण्याच्या निर्णयामध्ये सहमती दर्शवली आहे.

५) रशियावरील आर्थिक निर्बंध लादण्याचा अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, इटली, ग्रेट ब्रिटेन आदी देशांनी निर्णय घेतला आहे.

६) इतकंच नाही तर, रशियाचे चलन रुबलचे मूल सीमित करण्याचा निर्णयही त्यामध्ये सामील आहे. (Russia Vs Ukraine War)

७) ज्या रशियन नागरिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी 'गोल्डन पासपोर्ट'ची सुविधा होती, ती सुविधा रद्द करण्यात आली आहे.

८) युक्रेनच्या विरोधात आणि रशियाच्या समर्थनार्थ जे नागरिक आहे, त्यांचीही 'गोल्डन पासपोर्ट'ची सुविधा रद्द केली जाईल.

९) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना युक्रेनचे राष्ट्रपती वलोदिमीर जेलेंस्की UNSC द्वारे 'राजकीय समर्थन' देण्याची विनंती केली आहे.

१०) आतापर्यंत ३ लहान मुले आणि १९८ नागरिक या युद्धात मारले गेले आहेत. तर १११५ जखमी झालेले आहेत.

व्हिडीओ पहा : महायुद्धाचे ढग | Pudhari Podcast

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT