संग्रहित छायाचित्र 
Latest

Bangladesh : बांगलादेशमध्ये दुर्गा पुजा करणाऱ्या मंडळांवर जमावाकडून हल्ला; ३ ठार

backup backup

बांग्लादेशात (Bangladesh) पुन्हा हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार झाल्याची माहिती समोर झाली आहे. चांदपूर जिल्ह्यातील धार्मिक कट्टरतावाद्यांनी फेसबुकवरून अफवा पसरल्यानंतर हिंदुंवर हल्ला करण्यात आला. दरम्यान, गोळीबारही करण्यात आला, त्यात ३ हिंदुंचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बांग्लादेश हिंदू युनिटी काऊन्स्लिंगने ट्विट करून सांगितले की, "१३ ऑक्टोबर बांग्लादेशातील निंदनीय घटना आहे."

"अष्टमीच्या दिनी मूर्ती विसर्जन करत असताना पूजा मंडपामध्ये तोडफोड करण्यात आली आणि त्यात अनेक हिंदू जखमी झाले. सध्या हिंदूंना पूजामंडपाचे संरक्षण करावं लागत आहे. या प्रकरणावर संपूर्ण जग शांत आहे. आई दुर्गा सर्व हिंदुंवर आशीर्वाद देत राहील. हल्ला करणाऱ्यांना आई दुर्गा कधी माफ करणार नाही", असंही हिंदू युनिटी काऊन्स्लिंगने ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कट्टरतवाद्यांकडून हिंसा

बुधवारी रात्री सोशल मीडियावर हिंदुंकडून कुराणचा अपमान करण्यात आला असल्याची पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर धार्मिक कट्टरतावाद्यांनी दुर्गाच्या पुजेमध्ये तोडफोड केली. इतकंच नाही तर जेव्हा हिंदुंनी विरोध केला तेव्हा गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये ३ हिंदुंचा मृत्यू झाला.

यावर कुराणचा अपमान केल्याचा दावा नाकारत कमिला महानगर पूजा उद्जापोन कमिटीचे महासचिव शिबू प्रसाद दत्ता यांनी सांगितले की, कुणीतरी एकाने कुराणची एक काॅपी दिघीर पारमध्ये आणि एक काॅपी दुर्गा मंडपात सकाळी-सकाळी ठेवण्यात आली. त्यावेळी गार्ड झोपेत होते.

याशिवाय जिल्ह्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, धार्मिक कट्टरतावाद्यांनी दुर्गा पंडालोमध्ये कुराणची एक काॅपी ठेवली आणि त्याचे काही फोटो काढून पळून गेले. काही तासांनंतर फेसबुकचा वापर करून लोकांच्या भावना भडकविणाऱ्या पोस्ट फोटोसहीत व्हायरल झाल्या.

हिंदुंना मारहाण करण्यात आली

बांग्लादेश (Bangladesh) नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात-ए-इस्लाम या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिली. चांदपूर जिल्ह्यातील हाजीगंज, चट्टोग्राममधील बंशखली, चपैनवाबगंजमधील शिबगंज आणि काॅक्स बाजारातील पेकुआमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ला केला. तसेच हिंदू भक्तांना मारहाण करण्यात आली. यामध्ये प्रकरणात ३ हिंदुंचा मृत्यू झाला असला तरी पोलिसांकडून या माहितीला कोणताच दुजोरा दिलेला नाही.

पहा व्हिडीओ : ऐकूया सुब्बलक्ष्मी यांचं श्री वेंकटेश्वर सुप्रभातम स्तोत्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT