वॉशिंग्टन : अंतराळातील लहान-मोठ्या आकाराच्या शिळा मानवाला नेहमीच थक्क करीत आलेल्या आहेत. अशाच एका लघुग्रहाच्या (Asteroid) धडकेने पृथ्वीवरून डायनासोरचे साम्राज्य नष्ट झाले होते. भविष्यात माणसाला अशा धोक्याचा सामना करावा लागू नये म्हणून 'नासा'ने 'डार्ट मिशन'ची सुरुवात केली. या मोहिमेत पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या एखाद्या लघुग्रहावर यान धडकवून त्याची दिशा बदलता येऊ शकते हे सिद्ध झाले. मात्र, लघुग्रहांची भीती बाळगण्याऐवजी त्यांचा मानवी हितासाठी वापरही कसा करून घेता येईल याचीही चाचपणी सुरूच असते. अशा लघुग्रहांवरही मानवी वसाहत स्थापन करता येते का याचे कुतुहल तर अनेक वर्षांपासून आहे. 'नासा'ने तर अशा शहराचे डिझाईन 1970 च्या दशकातच तयार केले होते.
याबाबतच्या संशोधनाची माहिती 'फ्रंटियर्स इन अॅस्ट्रॉनॉमी अँड स्पेस' जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्या हे केवळ लिखित परिकल्पनांचा भाग आहे आणि रिसर्च पेपर हे स्वीकार करतो की सध्या किंवा निकटच्या भविष्यात असे घडण्यासाठीचे आवश्यक तंत्रज्ञान आपल्याकडे नाही. मात्र, भविष्यात लघुग्रहावर (Asteroid) शहर स्थापन करण्याचे स्वप्न साकारही होऊ शकते.
या प्रोजेक्टवर काम करणारे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक अॅडम फ्रँकयांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले की 'निकटच्या भविष्यात कुणीही एखाद्या लघुग्रहावर (Asteroid) शहर वसवण्यासाठी जाण्याची शक्यता नाही हे तर उघडच आहे. मात्र, अशा प्रकारच्या इंजिनिअरिंगसाठी ज्या तंत्रज्ञानाची गरज आहे ती भौतिकशास्त्राच्या नियमांच्या विरुद्ध नाही.' 'नासा'लाही या संकल्पनेवर विश्वास वाटतो. 1972 मध्ये भौतिक शास्त्रज्ञ गेरार्ड ओनील यांनी एका अशा अवकाशीय आवासाचे डिझाईन बनवले होते ज्याच्या माध्यमातून माणूस अंतराळात राहू शकेल. नवे अध्ययन या डिझाईनला 'मॉडिफाय' करणारे म्हणजे आणखी सुधारणा करणारे आहे.
'बेन्नू' लघुग्रहाच्या आकाराच्या म्हणजे सुमारे 300 मीटरच्या लघुग्रहाला (Asteroid) अशा प्रोजेक्टसाठी निवडता येऊ शकते. तिथे शहर वसवण्यासाठी तेथीलच सामग्रीचा वापर केला जाईल. हे स्वप्न साकार करण्यासाठी कार्बन नॅनोफायबरपासून बनवलेल्या बॅग मोठी भूमिका बजावू शकतात. या बॅग तिथे राहणार्या माणसाला रेडिएशन व कॉस्मिक वेव्हपासून वाचवतील.
हेही वाचा :