मुंबई ; पुढारी ऑनलाईन : आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहोत. माझ्याविरोधात तक्रार केली म्हणून सांगितले जात आहे; पण तक्रारीची प्रत त्यांनी दाखवावी. ठाकरे सरकारमधील मी घोटाळे बाहेर काढत असल्याने ते असे बोलत आहेत. संजय राऊत यांनी विक्रांत प्रकरणी घोटाळा झाल्याने त्यांनी दाखवावे, असे आव्हानही त्यांनी केले. (Kirit Somaiya)
, जरंडेश्वर कारखाना प्रकरणी मी सध्या शेतकऱ्यांसोबत ईडी कार्यालयात जाणार आहे. ठाकरे सरकारमधील मी प्रत्येकाचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सांगत त्यांनी अवघ्या दोन मिनिटांत आपली पत्रकार परिषद गुंडाळली. (Kirit Somaiya)
सोमय्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाना उत्तर न देताच गेल्याने काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. याचबरोबर सोमय्या आपल्या वाहनात बसल्यानंतर त्यांना तुम्ही खरच आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी पैसे गोळा केला होता का असा सवाल विचारल्यावर त्यांनी काच वर घेत निघून जाणे पसंत केले.