पुढारी ऑनलाईन डेस्क : तेजिंदरपाल सिंग तूर याने गोळाफेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण कामगिरी केली आहे. रविवारी (1 ऑक्टोबर) झालेल्या अंतिम सामन्यात त्याने 20.36 मीटर लांब गोळाफेक करून सुवर्णपदकावर नाव कोरले. तेजिंदरपाल सिंगने गोळाफेकमध्ये चमकदार कामगिरी केली. तो सलग दुसऱ्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. तजिंदरने 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते.
भारतासाठीचे हे आजच्या दिवभरातील तिसरे सुवर्णपदक आहे. याचबरोबर भारताच्या एकूण पदकांची संख्या 45 झाली असून यात 13 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ आणि सातव्या दिवशी पाच पदके मिळाली. आज भारत पदकांचे अर्धशतक पूर्ण करू शकतो.