पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आज (दि.१) नवा इतिहास रचला. भारताच्या अदिती अशोकने वैयक्तिक गोल्फ प्रकारात भारतासाठी रौप्य पदकाची कमाई केली आहे. गोल्फमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फर ठरली आहे. (Asian Games 2023)
अदिती अशोकने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आज (दि.१) आठव्या दिवशी भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. तिने गोल्फमध्ये रौप्य पदक जिंकले. यासह तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. या खेळांमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फर ठरली आहे.
आदिती ही सुवर्णपदक जिंकण्याच्या जवळ होती. तिच्याकडे सात स्ट्रोकची आघाडी होती. पण शेवटी ती दोन स्ट्रोक मागे पडली आणि सुवर्णपदक हुकले. येथे थायलंडच्या अपिर्चाया युबोलने सुवर्णपदक पटकावले अन् भारताच्या अदिती अशोकने सुवर्णपदकाची कमाई करत नवीन इतिहास रचला आहे.