Latest

आशिया चषक स्‍पर्धेवर श्रीलंकेची सहाव्यांदा मोहर, सर्वाधिकवेळा स्‍पर्धा जिंकण्‍याचा बहुमान भारताला

Arun Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक २०२२ चा पाकिस्तानविरूद्धचा अंतिम सामना जिंकत श्रीलंकेने सहाव्यांदा 'आशिया कप' आपल्या नावावर केला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. यापूर्वी श्रीलंकेने ५ वेळेस आशिया कप आपल्या नावावर केला होता. आशिया चषक २०२२ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर दिमाखदार विजय मिळवला.

श्रीलंकेचे सलग चार विजय

आशिया कप हा श्रीलंकेत होणार होता. देशातील परिस्थिती नाजूक असल्याने हि स्पर्धा दुबईला हलवली गेली. तरीही कागदावर यजमान म्हणून श्रीलंकन बोर्डाचे नाव होते. त्यातून ही स्पर्धा सुरू झाल्यावर पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकन संघाला मोठ्या पराभवाचा दणका दिला. साखळी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने कसाबसा विजय मिळवला आणि आव्हान कायम ठेवले. नंतर अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तानला पराभूत करून श्रीलंकेने सलग चार विजय मिळवले होते.

भारतानंतर श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर, सहावेळा आशिया चषक विजेता

आतापर्यंत भारताने विक्रमी सात वेळा आशिया कप जिंकला आहे. भारतानंतर श्रीलंकेने सहावेळा आशिया कप जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आपले नाव कोरले आहे. आतापर्यंत श्रीलंकेने १९८६, १९९७, २००४, २००८, २०१४ आणि २०२२ साली आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे.

सर्वाधिकवेळा स्‍पर्धा जिंकण्‍याचा बहुमान भारताला

आशिया चषकात आतापर्यंत सर्वाधिक सात वेळा ही स्पर्धा भारताने जिंकली आहे. १९८४ मध्ये झालेल्या आशिया चषकाचा पहिला हंगाम भारताने जिंकला होता. श्रीलंकेने १९८६ मध्ये विजेतेपद पटकावले आणि त्यानंतर भारताने १९८८, १९९१ आणि १९९५ मध्ये सलग तीन वेळा विजेतेपद पटकावले. यानंतर श्रीलंकेचा संघ १९९७ मध्ये आशिया कपचा विजेता ठरला. पाकिस्तानला २००० साली पहिल्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी मिळाली. यानंतर २००४ आणि २००८ मध्ये श्रीलंकेचा संघ विजेता ठरला होता. यानंतर २०१० मध्ये भारताने विजेतेपद पटकावले होते. २०१२ मध्ये पाकिस्तान संघाने दुसऱ्यांदा आशिया कप जिंकला. २०१४ मध्ये श्रीलंका आणि २०१६ आणि २०१८ मध्ये भारताने विजय मिळवला होता. भारताने ७ वेळा (१९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८) आशिया कप विजेतेपद पटकावले आहे.

पाकिस्तान केवळ दोनदाच विजयी

आशिया चषकाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पाकिस्तानला केवळ दोनदाच ही स्पर्धा जिंकता आली आहे. २०१२ पूर्वी त्याने २००० मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तर दोनदा तो उपविजेता ठरला आहे. हा सामना जिंकून पाकिस्तानने आशिया चषकावर तिसऱ्यांदा मोहर उमटवली आहे. श्रीलंकेने १९८६मध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता आणि त्यानंतर २०१४ मध्येही पाकिस्तानला श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT