Latest

Millet Grain : चंद्रपुरात मिलेट धान्याची तब्बल ६,७५० किलोची बनविली खिचडी

अविनाश सुतार

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा: आरोग्यकरिता मिलेट धान्य अत्यंत पोषक मानले जाते. या धान्याचा प्रसार व्हावा यासाठी चंद्रपुर येथे मिलेट धान्यापासून तब्बल ६ हजार ७५० किलोची खिचडी तयार तयार करण्याचा विश्वविक्रम करण्यात आला.प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी ही खिचडी तयार केली. Millet Grain

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद

विष्णू मनोहर हे ख्यातनाम शेफ आहेत. यापूर्वी देखील त्यांनी विश्वविक्रम केले आहेत. 2023 हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर यांनी 12 शहरात बारा विक्रम करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार त्यांनी यापूर्वी नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक येथे हा विक्रम केला. यापूर्वी त्यांनी नागपुरात 6500 किलोची खिचडी तयार केली होती. आज शुक्रवारी चंद्रपूर येथे हा विक्रम मोडीत काढत त्यांनी ६ हजार ७५०  किलोची खिचडी तयार केली. Millet Grain

अयोध्येत होणार सर्वात मोठा विश्वविक्रम

अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणाच्या वेळी आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम होणार आहे, अशी माहिती शेफ मनोहर यांनी चंद्रपुरात दिली.

 Millet Grain  आठ हजार किलो हलवा बनणार

अयोध्या येथे तब्बल आठ हजार किलो हलवा तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनोहर यांनी दिली. चंद्रपूर येथे विक्रमासाठी दहा बाय दहा ही लोखंडी कढईचा उपयोग करण्यात आला. मात्र, यासाठी तब्बल १५ फूट बाय १५ फूट इतकी कढई असणार आहे.

अशी होते तयारी

'दै. पुढारी'शी बोलताना विष्णू मनोहर यांनी, असे विक्रम करतानाच्या आव्हानाबाबत सांगितले. प्रत्येक ठिकाणच्या गोष्टींचा वेगळेपणा असतो म्हणूनच मनोहर हे आधी तिथले पाणी, अन्न धान्य मागवतात. ते आधी नागपुरात शिजवून घेतात. त्याचे वेगवेगळे प्रयोग करून बघतात यानंतर ते विक्रम करण्यास हा प्रयोग केला जातो.

 Millet Grain  मिलेट धान्याचे फायदे

मिलेट हे अत्यंत पोषक कडधान्य आहे. ज्वारी आणि गहू मध्ये जितके पोषक तत्वे आहेत. त्यापेक्षा मिलेटचे अनेक फायदे आहेत. यात भरपूर प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबर असतात.

शाळांना खिचडीचे वाटप

६ हजार ७५० किलोच्या खिचडीचे वाटप शहरातील मनपाच्या शाळांत करण्यात आले. तिथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना देखील याचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT