ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी आर्यन शाहरुख खान आणि त्याचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना तब्बल 25 दिवसांनी जामीन मिळाला. तीन दिवस चाललेल्या घमासान सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी गुरुवारी हा सशर्त जामीन मंजूर केला. १३ अटींवर आर्यनची घरवापसी आज होणार आहे.
जामीन आदेशाची प्रत शुक्रवारी सायंकाळी आर्थर रोड कारागृह प्रशासनाला सादर झाली आहे. त्यामुळे आर्यनची घरवापसी होणार आहे. हा निकाल म्हणजे शाहरुख आणि गौरी खानला एकाच वेळी दिवाळीचे आणि वाढदिवसाचेही गिफ्ट होय.
2 तारखेला धनत्रयोदशीने दीपोत्सवाला सुरुवात होत असून, याच दिवशी शाहरुखचा म्हणजेच आर्यनच्या अब्बाचा वाढदिवसदेखील आहे. त्यापूर्वीच आर्यन आपल्या घरी 'मन्नत'वर पोहोचलेला असेल.
1 आर्यनकडे कुठलेही ड्रग्ज आढळले नव्हते. त्याच्या ताब्यातून ड्रग्ज जप्तही करण्यात आले नाही. आर्यनने ड्रग्जचे सेवनही केलेले
नव्हते.
2 अरबाजच्या बुटातून ड्रग्ज आढळले होते. ते आर्यनसाठी होते, असे कुणीही कसे म्हणू शकतो? हे 'कॉन्शस पझेशन' (जाणीवपूर्वक
बाळगणे) म्हटले जाऊ शकत नाही.
3 आर्यन क्रूझ पार्टीत ग्राहक म्हणून हजर नव्हता, त्याला अतिथी म्हणून बोलविण्यात आले होते.
4 अशा प्रकारच्या लहानसहान प्रकरणात आधी नोटीस दिली जाते, चौकशी होते. पण आर्यनच्या प्रकरणात थेट अटकेची कारवाई
झाली, म्हणजे ड्रग्ज पार्टी नव्हे तर आर्यन हाच टार्गेट होता, असेच दिसते.
5 आर्यनविरुद्धचा गुन्हा एनडीपीएस कायद्याच्या कलम 67 नुसार आपल्या मर्जीने दिलेल्या जबाबावर आधारित आहे. तुफान
सिंग प्रकरणातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार कबुलीजबाब पुरावा म्हणून गृहीत धरता येत नाही.
6 आर्यनच्या चॅटिंगमध्ये क्रूझ पार्टीचा उल्लेखच नाही. चॅटिंगच्या आधारे कुठल्या कटाचा आरोपही सिद्ध होत नाही. आर्यनचा
मोबाईल फोन जप्त करण्यात आलेला नाही. पंचनाम्यातही तसा काही उल्लेख नाही. आर्यनची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नाही.
7 आर्यन खान आणि 'ड्रग्ज सप्लायर' अचित कुमारदरम्यानचे चॅटिंग पोकर गेम संदर्भात आहे. तेही दीड वर्ष जुने आहे. अचित हा
क्रूझवरही नव्हता. म्हणजेच त्याने आर्यनसोबत मिळून कुठले मनसुबे रचले असेही सिद्ध होत नाही.
8 आर्यनने ड्रग्ज घेतलेही असते तर त्यासाठी कमाल एक वर्षे कारावासाची शिक्षा आहे. त्यातही संबंधिताला सुधारणा केंद्रातच पाठविले जाते.
9 क्रूझमध्ये 1 हजार 300 लोक होते, आर्यन हा अरबाज व्यतिरिक्त आणखी कुणाला ओळखत होता, असे काहीही एनसीबीने म्हटलेले नाही. अरबाजव्यतिरिक्त अटकेतील उर्वरितांपैकी कुणालाही आर्यन ओळखत नाही, मग हा कट कसा?
10 एनसीबी जर याला कट म्हणतच असेल तर मग आर्यनला प्रतीक गाबा आणि मानव यांनी या पार्टीसाठी बोलावले होते, मग त्यांना अटक का नाही?