Latest

Mahua Moitra : अरुणाचल प्रदेश म्हणजे कच-याचा डब्बा नाही, तृणमूलच्या खासदार मोइत्रांचे वादग्रस्त ट्विट

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवणाऱ्या आयएएस दाम्पत्याच्या बदलीबाबत त्यांनी वादग्रस्त ट्विट केले आहे. आयएएस रिंकू दुग्गा आणि खिरवार यांची ईशान्येकडील राज्यांमध्ये बदली करून, गृह मंत्रालयाने ही राज्ये त्यांच्या दृष्टीने 'कचरा फेकण्याचे मैदान' असल्याचे संकेत दिल्याचा गंभीर आरोप मोईत्रा यंनी आपल्या ट्विटमधून केला आहे.

मोईत्रा (Mahua Moitra) यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांना त्यांचे ट्विट टॅग केले असून या दोघांनी अरुणाचल प्रदेशला दिलेल्या सापत्न वागणुकीबद्दल गृह मंत्रालयाच्या निषेध करण्याचे आवाहन केले आहे.

आयएएस दाम्पत्याच्या कुत्र्याला फिरण्यासाठी त्यागराजा स्टेडियम लवकर रिकामे करण्याचे आदेश खेळाडूंना देण्यात आले होते. हे प्रकरण माध्यमांसमोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत त्यांची बदली करण्यात आली.

यावर महुआ (Mahua Moitra) म्हणाल्या की, दिल्लीतील एका नोकरशहाची अरुणाचल प्रदेशात बदली होणे ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. खिरवार यांची लडाखमध्ये बदली झाली आहे, तर त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांची अरुणाचल प्रदेशात बदली करण्यात आली आहे.

हे दोन्ही आयएएस अधिकारी 1994 एजीएमयूटी कॅडरचे आहेत. खिरवार हे दिल्ली सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि पर्यावरण विभागाचे सचिव होते, तर रिंकू दुग्गा दिल्ली सरकारच्या भूमी आणि इमारत सचिव होत्या.

एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाने खिरवार व दुग्गा या आयएएस जोडप्याने दिल्ली सरकार संचालित स्टेडियमचा गैरवापर केल्याचा वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर दिल्ली सरकारने याची दखल घेत खेळाडूंना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये याबाबत लक्ष दिले आणि स्टेडियमधील क्रीडा सुविधा रात्री 10 वाजेपर्यंत खुल्या राहतील असे निर्देश जारी केले. +6त्यानंतर गुरुवारी आयएएस दाम्पत्याच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. संजीव खिरवार यांची लडाखमध्ये बदली करण्यात आली आहे, तर रिंकू दुग्गा यांची अरुणाचल प्रदेशात नियुक्ती करण्यात आली. या घटनेनंतर तृणमुल काँग्रेसच्या खासदार मोईआ महुत्रा भडकल्य आणि त्यांनी चुकीच्या आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याबद्दल अरुणाचल प्रदेशला शिक्षा का द्यायची असा सवाल उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT