पुढारी ऑनलाईन डेस्क : सुल्तान चित्रपटातून गाणं हटवल्यानंतर सलमान खान आणि गायक अरिजीत सिंह यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. तब्बल ९ वर्षांनंतर आता दोघांमध्ये पॅचअप झाले आहे. (Salman-Arijit Singh) अरिजीत सिंह सलमान खानच्या घरी भेटायला गेला. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत सलमान खानच्या घराबाहेर अरिजीत सिंहची गाडी दिसतेय. (Salman-Arijit Singh)
संबंधित बातम्या –
सध्या सलमान खान त्याच्या आगामी 'टायगर 3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, अरिजीत सलमानच्या अपार्टमेंटबाहेर स्पॉट झाला. त्यामुळे तब्बल ८ वर्षानंतर सलमान भाईजान आणि अरिजीत यांच्यामधील वाद संपुष्टात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
अरिजित सिंग सलमानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडताना दिसला. त्याच्या गाडीचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सलमान खानच्या एका चाहत्याने ट्विटरवर शेअर केला असून नेटकऱ्यांचे कॉमेंट्स येत आहेत. 'अरिजित सिंहला आज सलमान खानच्या घरी स्पॉट करण्यात आले, काय होत आहे?'
एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान दोघांमध्ये वाद झाला होता. जेव्हा सलमानने अरिजीतला विचारले की तू झोपत आहेस का, यावर अरिजितने उत्तर दिले, लोकांनी मला झोपवले. पण या बोलण्याने सलमान इतका नाराज झाला की, सोशल मीडियावर अरिजूतने माफी मागूनही सलमानने त्याला माफ केले नाही. सलमानने आफल्या 'सुल्तान' चित्रपटातून अरिजीचे गाणेदेखील काढून टाकले.