पुढारी ऑनलाईन डेस्क : वयाच्या ५६ व्या वर्षी अरबाज खानने लेडी लव्ह शौरा खानशी दुसऱ्यांदा निकाह केला आहे. अरबाज-शौरा खानच्या लग्नातील फोटो आणि व्हायरल झाले आहेत. एका फोटोमध्ये दोघांनी लिपलॉक केल्याचे दिसत आहे. (Arbaaz Shura Khan Wedding) फोटोमध्ये अरबाज खान रोमँटिक अंदाजात दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अरबाज आणि शौरा लिपलॉक करताना दिसत आहेत. वधूच्या वेषात सजलेल्या शौराने गुडघ्यावर बसून अरबाजला वेडिंग रिंग घातली. (Arbaaz Shura Khan Wedding)
संबंधित बातम्या –
videos- viralbhayani Instagram वरून साभार
अरबाजने लग्नात फ्लोरल प्रिंटेड सूट तर शौराने गोल्डन ब्लाऊज आणि प्रिंटेड लेहेंगा सोबत मॅचिंग दुपट्टा परिधान केला होता. शौराने आपल्या वेडिंग लूकसोबत हेवी नेकलेस, पिंक न्यूड मेकअप, ओपन कर्ली हेअर सोबत लूक पूर्ण केला. या लूकमध्ये ती परीसारखी दिसत होती. अरबाज आणि शौराचे लग्न ड्रिमी ठरले. दोघांच्या लग्नातील व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंना खूप सारे कॉमेंट्स आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
२४ डिसेंबरच्या रात्री दोघांनी लग्न केलं. सलमान-सोहेल यांच्यासोबत संपूर्ण खान परिवार लग्नात सहभागी झाला. लग्नानंतर अरबाजने शौरासाठी एक खास पोस्ट शेअर केली. फोटो शेअर करत अरबाजने कॅप्शन लिहिली की, आमच्या जवळच्या नातेवाईंकांच्या उपस्थितीत मी या दिवसापासून माझे आयुष्य प्रेमासोबत नवी सुरुवात करत आहोत. आमच्या खास दिनासाठी तुमच्या सदिच्छा आणि आशीर्वाद हवेत. अरबाजच्या या पोस्टला फॅन्स खूप लाईक करत आहेत.