Ant Death Spiral 
Latest

Ant Death Spiral : मुंग्‍यांसाठी ‘हे’ वर्तुळ म्‍हणजे मृत्‍यू अटळ

Arun Patil

नवी दिल्ली : नेहमी सरळ रेषेत चालणार्‍या मुंग्या अचानक एका गोल वर्तुळात फिरू लागतात. Ant Death Spiral कालांतराने या वर्तुळाचा व्यास आणि वर्तुळात फिरणार्‍या मुंग्यांची संख्या वाढू लागते. पण हे असे का होते, असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? मुंग्यांच्या या वर्तुळाला मृत्यूचे चक्र असे म्हटले जाते. वर्तुळात फिरत असताना अनेक मुंग्या आपला प्राण गमावतात; पण नेमके हे कशामुळं घडते हे जाणून घेऊया.

सैनिक मुंग्या त्यांना नेत्याचे अनुसरण करायचे इतकेच त्यांना माहिती असते. त्याच्यापलीकडे त्यांना काही माहिती नसते. ऐकायला हे जरी विचित्र वाटत असेल तरीदेखील हे खरं आहे. अनेकदा या सैनिक मुंग्या गोल-गोल फिरून इतक्या थकतात Ant Death Spiral की त्यातच त्यांचा मृत्यू होतो. याला इंग्रजीत 'डेथ स्पायरल' असे म्हणतात. डेथ स्पायरल ही एक अत्यंत विचित्र गोष्ट आहे. एका मुंगीचा पाठलाग करताना दुसरी मुंगीही या वर्तुळात फसली जाते. खरं तर सैनिक मुंग्या या आंधळ्या असतात. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या विशेष संप्रेरकांमुळे त्या त्यांच्या लीडरचा गंधानुसार त्यांच्या मागे चालत राहतात.

जर नेता मुंगी रस्ता भरकटली किंवा तिने ती रांग मोडली तर मागे चालणार्‍या या मुंग्यादेखील या डेथ स्पायरलमध्ये Ant Death Spiral फसतात. सैनिक मुंगी अंध असतील तरी वासावरून पदार्थ ओळखू शकते त्यामुळे ती आरामात फिरू शकते. मुंग्यांच्या शरीरात केमिकल (फेरोमोन्स) महत्त्वाची भूमिका बजावतात. या रसायनामुळे एका मुंगीच्या मागे दुसरी मुंगी येतेय. कधी कधी दिशा भरकटल्यामुळे मागून येणार्‍या मुंग्या या भ्रमित होतात. त्यानंतर मुंग्या एका वर्तुळात गोल गोल फिरायला सुरुवात करतात; पण हे वर्तुळ मृत्यूनेच संपते. अनेक वर्षांपासून पृथ्वीवर हे घडत आहे.

सगळ्यात पहिले 1936 रोजी याबाबत माहिती कळाली. एक अँटबायोलॉजिस्ट संपूर्ण दिवस शेकडो मुंग्यांचा अभ्यास करत होता. तेव्हा त्याने पाहिलं की, मोठ्या संख्येने मुंग्या एका वर्तुळात फिरत आहेत. संपूर्ण एक दिवस त्या न थांबता फिरत होत्या. पाऊस पडला तरी त्या थांबल्या नाहीत. दुसर्‍या दिवशी यातील अनेक मुंग्या मेल्या होत्या व ज्या जिवंत होत्या त्या अजूनही त्या वर्तुळात फिरत होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT