anil kapoor 
Latest

Anil Kapoor : अनिल कपूर सुभेदार चित्रपटात दिसणार, हिटअँड्रॉईड ‘कुंजप्पन व्हेर 5.25’ ही चर्चेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनिल कपूर सुभेदार चित्रपटात दिसणार आहे. (Anil Kapoor ) त्यासोबत हिटअँड्रॉईड 'कुंजप्पन व्हेर 5.25' हा चित्रपटही त्यांनी साईन केला आहे. अनिल कपूर या वर्षात अनेक नव्या प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहेत. हाय-ऑक्टेन अॅक्शन फिल्म सुभेदार आणि २०१९ चा मल्याळम-भाषेतील हिटअँड्रॉइड कुंजप्पन व्हेर 5.25 हिंदी भाषेत येणार आहे. यासाठी चित्रीकरण करण्यात ते लवकरच व्यस्त होणार असल्याचा चर्चा आहेत. (Anil Kapoor )

२०२३ मध्ये अनिल कपूर यांना आपण बॅक टू बॅक ओटीटीवर काम करताना पाहिले आहे. प्रथम ते 'द नाईट मॅनेजर'मध्ये शेलीच्या भूमिकेत दिसले. यासाठी त्यांनी खूप प्रशंसा मिळवली. पुढे, जेरेमी रेनरच्या रेनरव्हेशन्सचा संपूर्ण भाग अभिनेते अनिल यांच्यासोबत शूट करण्यात आला.

आता, त्यांनी पुष्टी केली आहे की, ते अबंडंटिया एंटरटेनमेंट निर्मित सुभेदार या अॅक्शन ओरिएंटेड चित्रपटात काम करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी करणार आहेत. अनिल कपूर म्हणाले, "मी अनेक अॅक्शन चित्रपट केले आहेत. परंतु ही एक शुद्ध अॅक्शन फिल्म आहे, एक ड्रामाटिक अॅक्शन फिल्म आहे. मी याबद्दल उत्सुक आहे. सध्या प्लॉट पूर्ण केला असून मुख्य फोटोग्राफी १५ सप्टेंबरपासून सुरू होईल.

अनिल यांनी असेही स्पष्ट केले की, ते २०१९ च्या मल्याळम ब्लॉकबस्टर Android Kunjappan Ver 5.25 च्या हिंदी भाषेतील चित्रपटात नायकाची भूमिका साकारणार आहेत, जे वडील-मुलाच्या संबंधावर केंद्रित आहे आणि AI humanoid च्या आगमनामुळे त्यांच्या जीवनावर कसा परिणाम होतो, अशी कथा आहे.

अनिल कपूर सध्या संदीप रेड्डी वंगा लिखित अॅनिमल या अॅक्शन ड्रामाचे शूटिंग करत आहेत. ज्यामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे, तसेच सिद्धार्थ आनंदचा हवाई अॅक्शन चित्रपट फायटर, ज्यामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणदेखील आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT