रियाध; वृत्तसंस्था : उत्खननाअंती सौदी अरेबिया या देशात तब्बल 8 हजार वर्षे जुने शहर जमिनीच्या पोटात आढळले आहे. खोदकाम सुरू असताना एक मंदिरही आढळले. राजधानी रियाधच्या नैऋत्य दिशेला असलेल्या 'अल-फॉ' या ठिकाणी हे अवशेष सापडले आहेत.
पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांनी या जागेचे सर्वेक्षण केले असून त्यासाठी एरियल फोटोग्राफीसह ड्रोन फुटेज, रिमोट व लेझर सेन्सिंगसह अन्य उपकरणांचा वापर करण्यात आला होता. सापडलेल्या मंदिरात धार्मिक अनुष्ठानांसाठीची वेदीही आहे. आठ हजार वर्षांपूर्वी सौदी अरेबियातील लोक पूजा, अनुष्ठान करत होते, हे यातून समोर आले आहे.
तुर्वाईक डोंगरालगत प्राचीन काळी सुनियोजित शहर वसलेले होते, असा निष्कर्ष या उत्खननातून पुरातत्त्व विभागाने काढला आहे. या शहराच्या कोपर्यावर चार बुरुज आहेत. वाळवंटी भागात कालवे, जलकुंभ आणि शेकडो खड्ड्यांवरून त्या काळातीलगूढ सिंचन प्रणालीही अधोरेखित झाली आहे. 'अल-फॉ' हा परिसर अनेक वर्षांपासून पुरातत्त्व अध्ययनाचे केंद्र आहे.