Bharti Singh 
Latest

The Great Indian Kapil Show : भारती सिंह ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये नसणार! कारण आले समोर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' नव्या रूपात आणि OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर परतला आहे. शोची जवळपास संपूर्ण कोर टीम एकत्र आहे. पण यावेळी भारती सिंह या शोचा भाग असणार नाही. भारती कपिल शर्माच्या शोमध्ये त्याच्या आत्याची भूमिका साकारताना दिसत होती. याशिवाय तिने शोमध्ये अनेक भूमिका साकारल्या होत्या. पण, नव्या सीझनमध्ये भारती सिंह दिसणार नाही. तर सुनील ग्रोवरने अनेक वर्षांनंतर नव्या सीजनमधून शोमध्ये वापसी केली आहे. The Great Indian Kapil Show मध्ये कपिल शिवाय कृष्णा अभिषेक, अर्चना पूरन सिंह, राजीव ठाकुर आणि कीकू शारदा आहे. नुकताच निर्मात्यांनी नवा प्रोमो देखील रिलीज केला आहे, ज्यामध्ये हेच कलाकार दिसले. पण भारती सिंह किंवा चंदू चायवाला (चंदन प्रभाकर) दिसला नाही. (The Great Indian Kapil Show )

भारती सिंहने एका वेबसाईटशी बोलताना सांगितले, 'सध्या माझा कपिल भाई सोबत काम करण्याचा विचार नाही. पण, जर काही असेल तर मी नक्कीच सहभागी होईन. सध्या मी आपल्या प्रोजेक्ट्स, पॉडकास्ट, 'डान्स दीवाने'ची शूटिंग वगैरेमध्ये बिझी आहे. पण, जर मला कॉल आला, तर मी नक्की जाईन. सध्या माझ्या झोळीत अनेक गोष्चा आहेत, नवं काहीतरी करण्यासाठी वेळ कमी आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT