ananya pandey  
Latest

Ananya Panday New Home : अनन्या पांडेने घेतलं नवं घर (Video Viral)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : धनत्रयोदशीला अभिनेत्री अनन्या पांडेने आपल्या घराचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. (Ananya Panday New Home ) तिने मुंबईत एक नवं घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर आपल्या नव्या घरामधील गृहप्रवेशाचे काही फोटो तिने पोस्ट केली आहेत. खूप कमी वयात अनन्याने आपले नाव कमावले आहे. दिवाळीच्या शुभ दिनी तिने स्वत: ला एक मोठं गिफ्ट दिलं आहे. धनत्रय़ोदशीच्या निमित्ताने अनन्या पांडेने फोटो शेअर करत म्हटले आहे- (Ananya Panday New Home )

संबंधित बातम्या –

"माझं स्वत:चं घर!! नवी सुरुवात आपल्या सर्वांचे प्रेम आणि चांगल्या भावनांची गरज आहे!!! धनत्रयोदशीच्या शुभेछ्छा." पहिल्या फोटोमध्ये, अनन्या पिवळ्या रंगाच्या एथनिक आऊटफिटमध्ये दिसते. पहिल्या फोटोमध्ये हात जोडून पोज देताना ती दिसते. तिने आपल्या नव्या घरात एका पुजेचं आयोजन केलं होतं. गृहप्रवेशाच्या वेळचा तिचा नारळ फोडतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

तिने पोस्ट शेअर केल्यानंतर मित्र, फॅन्स, सेलेब्सनी कॉमेंट्स देणे सुरु केले. रेड हार्ट इमोजी शेअर करून तिचे अभिनंदन केले जात आहे. फराह खानने कॉमेंटमध्ये लिहिलं, "वाह! हे टचिंग होतं अनन्या.. या घरात तुला अपार भाग्य आणि आनंद मिळो."

शिल्पा शेट्टीने लिहिलं, "अभिनंदन माझी प्रेमळ अनन्या. तुला आणखी शक्ती मिळो." टायगर श्रॉफने कॉमेंट केलं, "वाह, अभिनंदन अनन्या." गौहर खानने लिहिलं, "खूप खूप अभिनंदन, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो."

दरम्यान, अनन्या 'खो गए हम कहां' मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत. तिच्या झोळीत प्राईम व्हिडिओचा वेब शो 'कॉल मी बे' देखील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT