Latest

अनन्याच्या ‘ड्रीम गर्ल 2’चे प्रमोशन

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन : 'ड्रीम गर्ल 2' या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अनन्या पांडे आता बरीच व्यस्त झाली आहे. तिचे प्रमोशनल लूक अगदी स्टनिंग स्वरूपाचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आले आहेत. एरव्ही अनन्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

शिवाय, पारंपरिक साडी असेल किंवा मॉडर्न पँट-सूट या प्रत्येक पेहरावात ती सहजपणे परफेक्शनचा दाखला देते. आपल्या इन्स्टा डायरीजच्या माध्यमातून ती सर्व चाहत्यांना प्रेरणा देत असते. अलीकडेच तिने पिवळ्या साडीतील आपला नवा लूक सोशल मीडियावर अपलोड केला असून तो तिच्या फॉलोअर्सना पसंतीसही पडला आहे. 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनौमध्ये आल्यानंतरही तिने आपल्या फॉलोअर्ससाठी बरेच अपडेट पोस्ट केले. सेलिब—ेटी फॅशन स्टायलिस्ट मीगन कॉन्सेसिओच्या मदतीने ती ग्रीन इमरॅल्ड इयरिंग व मँचिंग बँगल्सने सजली होती.

'ड्रीम गर्ल 2' चित्रपटासाठी मी विशेष महत्त्वाकांक्षी आहे. हा चित्रपट आपल्या सर्वांना निश्चितपणाने आवडेल, याची मला खात्री वाटते, असे ती याप्रसंगी म्हणाली. तिचा हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT