anand mohan 
Latest

Anand Mohan : IAS अधिकारी कृष्णैय्याच्या हत्या प्रकरणातील दोषी माजी खासदार आनंद मोहन तुरुंगातून सुटले

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : बिहारचा बाहुबली माजी खासदार आनंद मोहन Anand Mohan याची आज पहाटे 4 वाजता तुरुंगातून सुटका झाली आहे. आनंद मोहन गोपालगंज येथील तत्कालीन डीएम जी. कृष्णैय्या यांच्या हत्या प्रकरणी त्यांची शिक्षा पूर्ण झाली आहे. ते जवळपास 15 वर्ष तुरुंगात होते. विशेष म्हणजे मुलाच्या साखरपुड्यासाठी ते नुकतेच पॅरोलवर सुटले होते आणि त्यांनी काल बुधवारीच (26 एप्रिल) पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर आज गुरुवारी पहाटे चार वाजता त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले. मुळात सुरुवातीला फाशी नंतर आजीवन कारावास, अशी शिक्षा झालेला आनंद मोहन याला शिक्षा पूर्ण होण्याच्या 4 वर्षापूर्वीच सोडण्यात आले आहे. नितीश कुमार यांनी तुरुंग प्रशासनाच्या कायद्यात बदल केल्यामुळे आनंद मोहनची शिक्षा कमी झाली आहे. परिणामी यावरून मोठी चर्चा सुरू आहे.

Anand Mohan : पहाटेच्या सुटकेमुळे समर्थक नाराज, स्वागताची केली होती तयारी

आनंद मोहनला सरहसा तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथूनच त्याला सोडले जाणार होते. दरम्यान, त्याची आज दुपारी सुटका करण्यात येणार आहे, अशी माहिती होती. त्यामुळे सकाळपासूनच आनंद मोहन यांचे समर्थक तिथे पोहोचले होते. त्यांनी त्याच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती. मात्र, तिथे पोहोचल्यावर त्यांना आनंद मोहन यांना पहाटे 4 वाजताच सोडून देण्यात आले आहे, असे त्यांना कळाले. त्यामुळे त्यांचे समर्थक थोडे नाराज झाले. दरम्यान, सुटकेनंतर आनंद मोहन हे कोठे गेले आहे, हे अद्याप माहिती नाही.

Anand Mohan : कायदेशीर प्रक्रिया पूर्ण

आनंद मोहन यांच्या सुटकेची कायदेशीर कागदी प्रक्रिया काल बुधवारीच पूर्ण झाली होती, अशी माहिती सूत्रांकडून समजत आहे. तुरुंगाच्या मैनुअलमध्ये संशोधन केल्यानंतर बाहुबली पूर्व खासदार आनंद मोहन यांच्या समवेत 27 कैद्यांना देखील आज सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,

या गुन्ह्यात आनंद मोहन (Anand Mohan) यांना झाली होती शिक्षा

आनंद मोहन यांच्या पक्षाचे नेते छोटान शुक्ला याची 4 डिसेंबर 1994 रोजी ह्त्या

5 डिसेंबर 1994 रोजी मुझफ्फरपूरमध्ये जोरदार गोंधळ

आनंद मोहन यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली

आनंद मोहन यांनी जमावाला चिथावणी दिली

आंदोलनादरम्यान कृष्णय्या गोपालगंजला परतत होते

संतप्त जमावाने कृष्णय्या यांच्या गाडीवर हल्ला केला

आधी मारहाण, नंतर गोळ्या घालून हत्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT