anand l rai aatmapamphlet  
Latest

आनंद एल राय यांच्या “आत्मपॅम्फ्लेट” चित्रपटाचा टीझर आऊट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन चा आगामी मराठी चित्रपट "आत्मपॅम्फ्लेट"चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ६ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. चित्रपटाचा टीझर खूप लक्षवेधी आणि आणि विचार करायला लावणारा असून हा एक अफलातून सिनेमॅटिक अनुभव असणार असल्याचं दिसतंय.

कलर यलो प्रॉडक्शनने त्यांच्या सोशल मीडियावर टीझर शेयर करून कॅप्शन लिहिलंय- "हे काही जाडजूड आत्मचरित्र नाही, हे साधे आहे 'आत्मपॅम्फ्लेट' ! पाहा त्याची पहिली झलक… 'आत्ममॅम्फ्लेट' ६ ऑक्टोबर पासून चित्रपट गृहात ! "आत्मपॅम्फ्लेट" या चित्रपटाला ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'स्पर्धा विभागात' अधिकृतपणे निवडल्याचा प्रतिष्ठित चित्रपटाचा सन्मान देखील मिळाला आहे.
चित्रपटाच्या उत्तम कलात्मक आणि कथाकथन कलाकृती चा हा अनोखा नमुना असणार आहे. उत्कृष्टतेचा दाखला आहे. आशिष बेंडे दिग्दर्शित या चित्रपटात प्रतिभावान ओम बेंडखळे, राजरत्न भोजने, खुशी हजारे, भीमराव मुडे आणि इतर अनेक कलाकार आहेत. भूषण कुमार, कृष्णन कुमार, कनुप्रिया ए अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज ने सहनिर्मिती केली आहे. मोठ्या पडद्यावर "आत्मपॅम्फलेट"ची जादू पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. कलर येलो प्रॉडक्शन चा झिम्मा २, फिर आयी हसीन दिलरुबा आणि तेरे इश्क में यासह अनेक प्रोजेक्ट येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT